Wed, Jan 23, 2019 19:50होमपेज › Belgaon › बेळगावकर पाहणार वाघ

बेळगावकर पाहणार वाघ

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:05PMबेळगाव : प्रतिनिधी

येथील भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात लवकरच वाघ आणण्यात येईल, अशी माहिती माजी मंत्री आणि आ. सतीश जारकीहोळी यांनी पत्रकारांना दिली. यासाठी ‘सेंट्रल झू अ‍ॅथॉरिटीने’ परवानगी दिली आहे, असेही ते म्हणाले. 

म्हैसूरच्या धर्तीवर बेळगावमधील भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयाचा विकास करण्यात येईल. म्हैसूर प्राणी संग्रहालयामध्ये जे प्राणी आहेत ते बेळगावात आणण्यात येतील. या प्राणी संग्रहालयाच्या विकासासाठी महापालिकेने यापूर्वी दोन कोटीचा निधी मंजूर केला आहे. यासाठी आता अणखी तीन कोटीचा निधी देण्यात येईल. केंद्रीय प्राणी संग्रहालयातील अधिकार्‍यांच्या सूचनेनुसार बेळगावातील संग्रहालयामध्ये बदल करण्यात येईल. यासाठी आणखी निधीची मागणी झाल्यास तो तात्काळ उपलब्ध करुन देण्यात येईल.भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात सध्या विविध पक्षी, मगर, हरीण, काळवीट, मत्स्यालय आदीसह अनेक प्राणी आहेत. आता वाघ, बिबटे आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. त्यादृष्टीने प्राणी संग्रहालयाची उभारणी करण्यात येईल, असेही जारकीहोळी म्हणाले.