Mon, Jan 21, 2019 13:04



होमपेज › Belgaon › वाघाचा हल्‍ला; बैल जखमी

वाघाचा हल्‍ला; बैल जखमी

Published On: Aug 01 2018 1:21AM | Last Updated: Aug 01 2018 12:21AM



खानापूर : वार्ताहर

तालुक्यातील गुंजी गावापासून अवघ्या अर्धा कि.मी. अंतरावर शेतात चरावयास सोडलेल्या बैलावर शेतकर्‍याच्या डोळ्यादेखत वाघाने हल्ला केल्याची घटना मंगळवारी दुपारी  घडली. यात बैल गंभीर जखमी झाला.

मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास प्रसाद रामचंद्र घाडी यांनी बैलाला चरण्यासाठी सोडले होते. झुडपातून आलेल्या वाघाने अचानक हल्ला केला. बेळगाव-पणजी महामार्गाला लागूनच ही घटना घडली. सुरुवातीला बैलावर अस्वलाने हल्ला केल्याचा संशय प्रसाद यांना आला. त्यामुळे त्यांनी आरडाओरड केली. मात्र, प्रत्यक्षात पट्टेरी वाघ असल्याने प्रसादने आरडाओरड करून इतरांना बोलाविले. त्यानंतर वाघाने धूम ठोकली. नंतर वनखात्याच्या अधिकार्‍यांना माहिती देण्यात आली. तसेच पशू संपगोपन खात्याचे डॉ. चरंतीमठ यांनी बैलावर उपचार केले.