Mon, Jan 27, 2020 10:44होमपेज › Belgaon › ‘हिंडाल्को’वर दगडफेक

‘हिंडाल्को’वर दगडफेक

Published On: Dec 03 2017 1:09AM | Last Updated: Dec 02 2017 11:29PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

फॅक्टरीसाठी जागा घेतल्या, मात्र आमच्या मुलांना कामावर घेतले जात नाही. शनिवारी झालेल्या मुलाखतीस आपल्या मुलाला हिंडाल्को व्यवस्थापनाने बोलावले नाही, या रागातून व्हळ्याप्पा दड्डी (वय 50, रा. मुत्यानट्टी) याने फॅक्टरीच्या कार्यालयावर दगडफेक केली. या प्रकरणी व्हळ्याप्पाच्या विरोधात माळमारुती पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.

व्हळ्याप्पाची जमीन फॅक्टरीसाठी संपादित करण्यात आली होती. व्यवस्थापनाने जमिनीच्या मोबदल्यात आर्थिक भरपाई देताना त्याच्या मुलाला सेवेत सामावून घेण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, शनिवारी होणार्‍या मुलाखतीस आपल्या मुलाला बोलाविण्यात न आल्याचा जाब विचारण्यास व्हळ्याप्पा गेला होता.

त्यावेळी  अधिकार्‍यांशी त्याची शाब्दिक चकमक उडाली.व्हळ्याप्पाने कार्यालयावर केलेल्या दगडफेकीत कार्यालयाची तावदाने फुटली. याबाबत अधिक चौकशी सुरू असल्याचे सांगितले.