Mon, Apr 22, 2019 21:51होमपेज › Belgaon › कोल्ड स्टोअरेजच्या तीन मालकांना अटक 

कोल्ड स्टोअरेजच्या तीन मालकांना अटक 

Published On: Mar 04 2018 1:45AM | Last Updated: Mar 03 2018 11:45PMबेळगाव : प्रतिनिधी         

कणबर्गी औद्योगिक वसाहतीत शीतगृहाच्या नावाखाली कत्तलखाने चालविण्यात येत असल्याचा आरोप सिध्द झाल्याने कोल्ड स्टोअरेजच्या तीन मालकांना पोलिस खात्याच्या विशेष पथकाने शनिवारी अटक केली आहे.

नील अ‍ॅग्रो फॅक्टरीचा मालक मोबीन अब्दुलकरीम बेपारी रा. कँप, फिजा फॅक्टरीचा मालक मीनाज चांदशेख रा. कणबर्गी व एसबी ट्रेडर्सचा मालक नयूम याकूब चौधरी रा. कँप अशी त्यांची नावे आहेत.

शीतगृहाच्या नावाखाली  कत्तलखाने चालविण्यात येत असल्याची तक्रार नागरिकांनी माळमारुती पोलिसांत केल्यानंतर 26 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी कणबर्गी औद्योगिक परिसराला भेट देऊन पाहणी केली होती. यावेळी सेव्हन स्टार ग्रुप, नेली अ‍ॅग्रो फॅक्टरी, सृष्टी अ‍ॅग्रो अ‍ॅन्ड कोल्ड स्टोअरेज, बरफवाला कोल्ड स्टोअरेज, बरफवाला फूड अ‍ॅन्ड अ‍ॅग्रो प्रोसेसर, क्राईश अ‍ॅग्रो अ‍ॅन्ड कोल्ड स्टोअरेज, फिजा एक्स्पोर्ट्स, एस. बी. ट्रेडर्स या 8 कोल्ड स्टोअरेजची माळमारुती पोलिसांनी चौकशी चालविली होती. या कोल्ड स्टोअरेजमधील मांसाचे नमुने तपासणीसाठी हैदराबाद येथील प्रयोशशाळेकडे पाठवून दिले होते.सध्या  कोल्ड स्टोअरजेच्या तीन मालकांना अटक झाली असून अद्याप 5 कोल्डस्टोअरेजच्या 14 मालकांची चौकशी सुरू आहे. 

शीतगृहाच्या नावाखाली नियम धाब्यावर बसवून येथे जनावरांची कत्तल करण्यात येत होती. तसेच जिल्हा प्रशासन, महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच अन्न सुरक्षा मंडळाचे याकडे साफ दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप करण्यात येत आहे.