बंगळूर : प्रतिनिधी
काँग्रेसकडून शेवटचे मोठे राज्य हस्तगत करण्यासाठी उत्सुक असलेल्या भाजपने शेतकर्यांच्या आत्महत्यांना काँग्रेसला जबाबदार धरले आहे. अन्नदात्या शेतकर्यांना दु:ख, कर्नाटकात कायद्याची अधोगती आणि सिद्धरामय्या सरकार बंगळूरचे कारस्थानकार, अशी शीर्षके असलेल्या तीन पुस्तिका आरोपपत्रांच्या रूपात रविवारी भाजपने प्रकाशित केल्या.
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा आणि डी. व्ही. सदानंद गौडा या तीन नेत्यांच्या हस्ते तीन आरोप पत्रांचे अनावरण करण्यात आले. मल्लेश्वरम्मध्ये हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता.
गेल्या 5 वर्षात कर्नाटकात सुमारे साडेतीन हजार शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याला सर्वस्वी सिद्धरामय्या सरकार जबाबदार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तोच आरोप आज पुस्तिकेच्या रुपात करण्यात आला. याशिवाय गेल्या 5 वर्षात भाजपच्या 23 कार्यकर्त्यांची हत्या झाली आहे. ही कायद्याची अधोगती असून यालाही सिद्धरामय्याच जबाबदार असल्याची टीका भाजपने केली आहे.
गुत्तेदारांच्या प्रवेशाने भाजपमध्ये कलह
गुलबर्ग्याचे प्रभावी नेते मलिकय्या गुत्तेदार यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत कलह सुरू झाला असून अनेक भाजप नेते माझ्या संपर्कात आहेत, असा दावा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.
चामुंडेश्वरी मतदार संघाच्या दौर्यात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले. गुत्तेदार हे काही राज्यस्तरावरचे नेते नाहीत. शिवाय त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गुलबर्गा जिल्ह्यातील स्थानिक भाजप नेत्यांनी काय करावे?. त्यांचे राजकीय भवितव्य काय? यामुळे त्यानेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला असून प्रवेश देण्याबाबत चर्चा सुरू आहे.
भाजपने कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेस बहुमत मिळविणारच. भाजपलाही त्याची जाणीव झाली आहे. त्यामुळेच त्यांनी काँग्रेस नेत्यांना आपल्या पक्षात ओढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. पण त्यांना त्यात यश येणार नाही, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला.
May 06 2018 1:07AM
May 06 2018 1:07AM
May 06 2018 1:07AM
May 06 2018 1:07AM
May 06 2018 1:07AM
May 06 2018 1:07AM