Wed, Apr 24, 2019 19:34होमपेज › Belgaon › मुधोळनजीक दुर्घटना; मृतांत पती-पत्नी, नातलग

अपघातात तिघे ठार 

Published On: Sep 09 2018 2:11AM | Last Updated: Sep 09 2018 2:11AMअंकली : प्रतिनिधी 

मुधोळबाहेरील (जि.  बागलकोट) मुख्य रस्त्यावर ट्रक व मारुती ओम्नीची समोरासमोर भीषण टक्कर होऊन तीन जण जागीच ठार झाले. हा अपघात शनिवारी दुपारी घडला. मृत व्यक्ती विजापूर जिल्ह्यातील कलकेरी येथील आहेत. ट्रकचालक विश्‍वनाथ (आंध प्रदेश) याला पोलिसांनी ताब्यात घेतलेे.

गोव्याहून कलकेरीकडे मुजावर कुटुंबीय ओम्नीमधून जात होते. त्यावेळी कोल्हापूरहून चेन्नईला मालवाहू ट्रक जात होता. मुधोळनजीक त्यांची समोरासमोर धडक झाली. यात ओम्नीचालक काशीमसाब मुजावर (वय 42), पत्नी आफ्रिन मुजावर (35) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांची नातलग सबिना नूरमहंमद मुजावर (40) यांना उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना    वाटेत त्यांचा मृत्यू झाला. काशीम मुजावर यांची मुले सानिया (वय 12), मुलगा सोहेल (वय 9) जखमी असून मुधोळ सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

बागलकोटचे जिल्हा पोलिस प्रमुख सी. बी. रिक्षांत, डीवायएसपी रामनगौडा हट्टी, सीपीआय कर्‍याप्पा बेन्नी, पीएसआय श्रीशैल ब्याकूड यांनी  घटनास्थळी जाऊन पाहणी केली.  सदर अपघाताची नोंद मुधोळ शहर पोलिस स्थानकात झाली आहे.