Sat, Apr 20, 2019 10:11होमपेज › Belgaon › तीन दिवस विवाह मुहूर्त ‘कॅश’

तीन दिवस विवाह मुहूर्त ‘कॅश’

Published On: Apr 21 2018 12:59AM | Last Updated: Apr 20 2018 11:53PMबेळगाव : प्रतिनिधी

सध्या शहर परिसरात लग्नसराईला वेग आला असून शुक्रवारी अनेकांनी हा मुहूर्त साधला. यामुळे शहरातील अनेक रस्ते व मंगलकार्यालये गर्दीने भरुन गेली होती. मंगलकार्यालय परिसरात असणार्‍या रस्त्यावर वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.यावर्षी लग्नाचे मुहूर्त कमी आहेत. कमी प्रमाणात मुहूर्त असल्याने मुहूर्त साधण्याची घाई प्रत्येकाला लागून राहिल्याचे दिसून येत आहे. याची प्रचिती शुक्रवारी दिसून आली. रस्त्यावरून वाजत गाजत जाणार्‍या वराती आणि वर्‍हाड्यांची धावपळ सुरू असल्याचे दिसून आले.

मागील आठवड्यापासून यावर्षीच्या लग्नहंगामाला खर्‍या अर्थाने वेग आला आहे. अनेक वधू-वरांच्या लग्नाच्या गाठी मुहूर्तावर बांधण्यात आल्या. बेळगाव शहरात शहापूर, शास्त्रीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात मंगल कार्यालये आहेत. याठिकाणी सकाळपासून गर्दी दिसून आली. शहापूर येथील छत्रपती शिवाजी उद्यानापासून वरातींना सुरुवात करण्यात येतात. वर्‍हाडी मंडळींच्या ताफ्यामुळे रस्त्यावर गर्दी होत असल्याचे वारंवार आढळून येते. बँन्डच्या तालात बेधुंद होवून नाचणारे वर्‍हाडी रस्ता अडवून ठेवतात. यामुळे या भागातील रस्त्यावर वाहतूक कोंडी  झाल्याचे दिसून आले. विशेषत: दुपारपर्यंत याभागात वाहनांची गर्दी वाढल्याने वाहतुकीला  अडथळा निर्माण झाला होता. 

कार्यालयांना पसंती

दारात लग्न लावण्याची प्रथा अनेक अडचणीमुळे मागे पडली आहे.यामुळे मंगलकार्यालयाना पसंती देण्यात येत असून कार्यालये मिळविण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. यावर्षी विवाहाचे मोजके मुहूर्त असल्याने धावपळ वाढली आहे . परिणामी शहरातील कार्यालये फुल्ल झाली आहेत.  

Tags : Belgaum, Three, days, wedding, cash