Sat, Feb 16, 2019 12:46होमपेज › Belgaon › अवकाळीने जंगलात पसरली पुन्हा हिरवाई

अवकाळीने जंगलात पसरली पुन्हा हिरवाई

Published On: Apr 22 2018 1:12AM | Last Updated: Apr 21 2018 11:52PMजांबोटी: वार्ताहर

गेले दोन महिने वाळून गेलेल्या जंगलाने अवकाळीच्या हजेरीनंतर हिरवा शालू परिधान केला आहे.  जांबोटीसह खानापूर तालुक्यात हे आल्हाददायक चित्र दिसत आहे. असे असले तरी जंगलात वास करणार्‍या प्राण्यांना अद्याप पाण्याची व्यवस्था झाली नसल्याने त्यांची भटकंती सुुरुच आहे.खानापूर हा बेळगाव जिल्ह्यातील  सर्वाधिक जंगलव्याप्त तालुका. त्यामुळे पावसाचे प्रमाणही सर्वाधिक असते. मात्र, फेब्रुवारी ते मार्चदरम्यान लागणार्‍या कडक उन्हाळ्यामुळे चित्रच बदलून जाते. नदी, नाले ,तळी कोरडी पडतात तर जंगलाचेही रुपडे बदलते.  यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. 

उन्हाच्या कडाक्याने वाळून गेलेल्या जंगलात वणव्यांचे धूर येत होते. मात्र, चार-पाच वेळा पडलेल्या अवकाळी पावसामुळे जंगलाला पूर्वीचे रुप प्राप्त झाले आहे. झाडांना पालवी फुटली असून सर्वत्र हिरवाई पसरली आहे. यामुळे पाल्यावर जगणार्‍या प्राण्यांच्या पोटाची व्यवस्था झाली आहे. तर काही प्रमाणात जमिनीवर रानानेही हिरवे रुप धारण केले आहे. 

बहाव्याला बहर

उन्हाळ्यात फुललेला लाल, नारिंगी, पिवळा, जांभळ्या फुलांचा बहावाही लक्षवेधी ठरत आहे.    रस्त्याला लागून तसेच जंगलामध्येही बहावा फुललेला दिसत आहे..

 Tags : Belagaon, picturesque, picture, seen,  Khanapur District