Thu, Jul 16, 2020 08:45होमपेज › Belgaon › निवडणूक लढवणार? शौचालय हवे..!

निवडणूक लढवणार? शौचालय हवे..!

Published On: Aug 05 2018 1:28AM | Last Updated: Aug 04 2018 11:17PMनिपाणी : प्रतिनिधी

 येत्या 29 ऑगस्ट रोजी होणार्‍या निपाणी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ उडाली असून घरी शौचालय बांधलेले असेल तर उमेदवारी अर्ज भरता येणार आहे. 

शनिवारी इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीविषयी माहिती जाणून घेतली. तसेच आपल्यासह सूचक पाच जणांचे घरफाळा, पाणीपट्टी भरुन ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी पालिकेकडे अर्ज केला आहे. जातीचा दाखला काढण्याासाठीही इच्छुक उमेदवारांनी तहसिलदार कार्यालयाकडे धाव घेतली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी 10 ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी होणार आहे. निपाणी पालिकेत 1 ते 8, 9 ते 16, 17 ते 24 व 25 ते 31 अशा वॉर्डांसाठी चार अधिकार्‍यांसाठी स्वतंत्र खोल्यांची व्यवस्था करण्यात येत आहे. सामान्य उमेदवारांसाठी 2 हजार तर एस.सी., एस.टी. उमेदवारांसाठही 1000 रु. डिपॉझीट भरावे लागणार आहे. 

पालिकेत घरफाळा, पाणीपट्टी भरुन ना हरकत प्रमाणपत्र घेण्यासाठी माजी नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, बाळासाहेब देसाई सरकार, यांच्यासह कांही इच्छुकांनी अर्ज केले आहेत.

शौचालय असणे सक्तीचे

निपाणी पालिकेची निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराचे घरी वैयक्तिक शौचालय असणे सक्तीचे करण्यात आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी नामपत्र एक प्रत व त्याच्या तीन झेरॉक्स अटेस्टेड केलेल्या असणे आवश्यक, उमेदवारांनी जातीचा दाखला तहसिलदारांकडून घेतलेला हवा, मान्यताप्राप्त राजकीय पक्षाची उमेदवारी असेल तर बी फॉर्म आवश्यक, तसेच डी फॉर्मही आवश्यक, निवडणूक पत्रकात कोणत्या पद्धतीने नांव प्रिंट करावयाचे याची सूचना द्यावी, शौचालय नसेल तर 20 रू.च्या बाँडवर प्रतित्रापत्र प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक, सहा पासपोट आकाराचे फोटो आवश्यक, निवडणुकीच्या फॉर्मवर सहीचे नमुने करून देणे, तहसिलदारांकडून घेतलेल्या मतदार यादीची सर्टिफाईड अटेस्टेड प्रत देणे उमेदवारांना बंधनकारक केले आहे.

दरम्यान भाजप कार्यालयात इच्छुकांनी आपण कोणत्या वॉर्डासाठी इच्छुक आहे याची नोंद देणे सुरू केले आहे. भाजपा व काँग्रेसची उमेदवारी मिळावी यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू आहेत.