Sun, Jul 21, 2019 01:27होमपेज › Belgaon › मंत्रिमंडळ विस्तारात देवेगौडांचा हस्तक्षेप नाही : कुमारस्वामी

मंत्रिमंडळ विस्तारात देवेगौडांचा हस्तक्षेप नाही : कुमारस्वामी

Published On: Jun 03 2018 1:30AM | Last Updated: Jun 03 2018 1:29AMबंगळूर : प्रतिनिधी

‘निजद’चे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी  मंत्रिमंडळ विस्तार किंवा खाते वाटपात हस्तक्षेप केलेला नाही. फक्‍त खाते वाटपाच्या यादीला ते संमती देतील, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी शनिवारी सांगितले.

काही माध्यमांनी एच. डी. देवेगौडा हेच मंत्रिमंडळ विस्तार व खातेवाटपात भूमिका बजावत आहेत, असे वृत्त दिले होते; पण यात तथ्य नसल्याचे कुमारस्वामी यांनी पत्रकारांना सांगितले. निजदचे एच. डी. रेवण्णा व काँग्रेसचे डी. के. शिवकुमार यांना ऊर्जामंत्रिपद स्वीकारण्याबद्दल हस्तक्षेप केला नसल्याचे कुमारस्वामी म्हणाले.