होमपेज › Belgaon › खडेबाजार विठ्ठल मंदिरात चोरी

खडेबाजार विठ्ठल मंदिरात चोरी

Published On: Aug 07 2018 12:58AM | Last Updated: Aug 07 2018 12:58AMबेळगाव : प्रतिनिधी

खडे बाजारातील विठ्ठल रखुमाई मंदिरातील दानपेटी फोडून 8 हजार रुपयांची चोरी केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. याप्रकरणी खडेबाजार पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. एरवी घरफोड्या, चेनस्नॅचिंग, अशा घटनांनी शहरवासीयांत खळबळ माजली असताना आता मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांनी पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे. ग्रामीण भागातील निर्जन ठिकाणी असणार्‍या मंदिरात चोरी चोरी करून चोरट्यांनी आता शहरातील भर वस्तींतील मंदिरांना लक्ष बनवले आहे. काल, रविवारी खानापूरजवळच्या चार मंदिरांमध्ये चोरी झाली होती.

खडे बाजार-बापट गल्लीत विठ्ठल व दत्त मंदिर अशी दोन मंदिरे एकमेकांशेजारी आहेत. विठ्ठल मंदिराच्या समोरील शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी मंदिरातील दानपेटी फोडली. आतील नोटा लांबवल्या; पण चिल्‍लर पैसे तसेच सोडून देण्यात आले आहेत. शेेजारील दत्त मंदिरामध्येही चोरीचा प्रयत्न करण्यात आला आहे.