Sun, Nov 18, 2018 19:48होमपेज › Belgaon › खादरवाडीच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

खादरवाडीच्या युवकाची रेल्वेखाली आत्महत्या

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:03AMबेळगाव : प्रतिनिधी

रविवारी सायंकाळी गौंडवाडच्या विद्यार्थ्याने गळफासाने जीवनयात्रा संपविल्याची घटना घडली असतानाच रविवारी मध्यरात्री मनोज नंदाजी पाटील (वय 24, रा. पाटील गल्‍ली, खादरवाडी) या युवकाने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली.

मनोज हा उद्यमबाग येथे कामाला होता. रविवारी त्याला सुट्टी होती. रात्री तो खादरवाडी गावात आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट सामने पाहण्यासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरानंतरही तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, सोमवारी सकाळी मजगाव ते देसूर दरम्यानच्या रेल्वेमार्गावर मनोजचा मृतदेह आढळून आला. सकाळी 9 वाजता रेल्वे पोलिसांना घटनेची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.

त्यानंतर मृतदेह शवागाराकडे पाठविण्यात आला. दुपारी शवचिकित्सेनंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. मनोज याच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांना कळालेले नाही.  दरम्यान, नंदाजी यांना तीन मुली असून मनोज हा एकुलता मुलगा होता. या प्रकरणी रेल्वे पोलिस पुढील चौकशी करत आहेत.