Fri, Jul 19, 2019 05:02होमपेज › Belgaon › दारूभट्टीवाल्यांचा ‘अबकारी’वर हल्‍ला

दारूभट्टीवाल्यांचा ‘अबकारी’वर हल्‍ला

Published On: Apr 08 2018 2:10AM | Last Updated: Apr 08 2018 12:20AMबेळगाव : प्रतिनिधी

तालुक्यातील करिकट्टी येथील जंगलभागात गावठी दारू तयार करणार्‍या अड्ड्यावर छापा घालण्यास गेलेल्या अबकारी खात्याच्या कर्मचार्‍यांवर दारू तयार करणार्‍यांनी तुफान दगडफेक करून त्यांना पिटाळून लावले. या घटनेत महिला कर्मचारी जखमी झाली. एस. वाय. सक्रवगोळ जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. 

विधानसभा निवडणुकीमुळे अबकारी पोलिसांकडून अवैध मद्यविक्रीवर छापा घालण्याचे सत्र सुरू केले आहे. गावठी मद्य तयार करणार्‍या गावांमध्येही छापा घालण्यात येत आहे. करीकट्टी येथे जंगलभागात दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती अबकारी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शनिवारी छापा टाकण्याचे नियोजन केले. एक निरीक्षक आणि तीन कर्मचार्‍यांसह  पोलिसांनी अड्ड्यांवर दुपारी 12 च्या सुमारास छापा टाकला. मात्र, गावठी दारू तयार करणार्‍यांनी पोलिसांवर तुफान दगडफेक करून पळवून लावले. पोलिसांनी प्रतिकार करत दारू भट्टीवाल्यांचा पाठलाग केला.