Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Belgaon › काँग्रेस रोडवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा बळी

काँग्रेस रोडवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचा बळी

Published On: Aug 28 2018 1:23AM | Last Updated: Aug 27 2018 11:46PMबेळगाव : प्रतिनिधी

काँग्रेस रोडवर अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी 6 वा. मिलिटरी महादेव मंदिराजवळ घडली. विजय फकिरा काळे (वय 54, रा. टिळकवाडी) असे मृताचे नाव आहे. खड्डे चुकवताना कारने दुचाकीला धडक दिल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

विजय काळे हे शिवबसवनगर येथील स्टेट बँकेमध्ये अटेंडर म्हणून सेवा बजावित होते. रोजच्या प्रमाणे ते कामावरून टिळकवाडी येथील आपल्या घराकडे जात होते. दरम्यान, काँग्रेस रोडवर  मिलिटरी महादेव मंदिराजवळ अज्ञात वाहनाने ठोकरल्याने ते कोसळले. 

घटनेची माहिती 108 रुग्णवाहिकेला देण्यात आली. तातडीने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपयोग झाला नाही. वाटतेच त्यांचा मृत्यू झाला होता. काळे हे मूळचे काकतीवेस गल्ली येथील रहिवासी असून काही दिवसांपूर्वी ते टिळकवाडी येथे वास्तव्याला गेले होते.  अपघाताची नोंद रहदारी दक्षिण विभाग पोलिस स्थानकात झाली आहे. 

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून काँग्रेस रोडवरही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खड्ड्यामुळे वाहनचालक त्रस्त असून खड्डे चुकवितानाच हा अपघात घडल्याची माहिती काही स्थानिकांनी दिली.