Wed, Jan 16, 2019 17:54होमपेज › Belgaon › ‘हेस्कॉम’ कार्यालयावर लाल-पिवळा बावटा

‘हेस्कॉम’ कार्यालयावर लाल-पिवळा बावटा

Published On: Dec 02 2017 12:40AM | Last Updated: Dec 01 2017 10:26PM

बुकमार्क करा

बेळगाव : प्रतिनिधी

अनधिकृत लाल-पिवळा बावटा सरकारी इमारतींवर लावण्याचा प्रकार सुरूच आहे. नेहरूनगर येथील ‘हेस्कॉम’ मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर लाल-पिवळा लावण्यात आला आहे. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान केला जात आहे. नागरिकांतून संताप व्यक्‍त करण्यात येत आहे. 

सरकारी कार्यालयांसमोर राष्ट्रध्वज असतानाही अधिकार्‍यांकडून कार्यालयावर लाल-पिवळा लावून राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा प्रकार सुरूच आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी लाल-पिवळ्या बावट्याला राज्याचा ध्वज म्हणून संमती मिळवून देण्यासाठी कायदेतज्ज्ञांकडे सल्ला मागितला होता. कायदेतज्ज्ञांनी राज्य सरकारचे कान पिळले होते. राष्ट्रध्वजाव्यतिरिक्‍त घटनेमध्ये इतर कोणत्या ध्वजाला मान्यता देण्याची तरतूद नसल्याचे स्पष्ट केले आहे.  राज्य सरकारच्या निर्णयावर अनेक कायदेतज्ज्ञांनी टीका केली होती. यामुळे लाल-पिवळा बावट्याला मान्यता मिळालेली नाही. असे असताना सरकारी अधिकार्‍यांकडून कार्यालयांवर लाल - पिवळा लावून राष्ट्रध्वजाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

नेहरूनगर येथील ‘हेस्कॉम’च्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर लाल पिवळा लावण्यात आला आहे. वीज वितरण विभागाच्या मुख्य कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयावर हा बावटा लावण्यात आल्याने नागरिकांतून ‘हेस्कॉम’च्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे. हा बावटा त्वरित उतरविण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. 

सरकारी कार्यालयातील अधिकार्‍यांकडून जबाबदारी विसरुन असा हलगर्जीपणा दाखविला जात असल्याने काही देशप्रेमी नागरिकांतून अवमान याचिका दाखल करण्याच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे संबंधित अधिकारी गोत्यात येण्याची शक्यता आहे.