Wed, Jan 23, 2019 08:35होमपेज › Belgaon › स्वातंत्र्यदिनानिमित्त खादी कपडे खरेदीकडे कल वाढला 

स्वातंत्र्यदिनानिमित्त खादी कपडे खरेदीकडे कल वाढला 

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 11:44PMबेळगाव : प्रतिनिधी

स्वातंत्र्यदिनाचे औचित साधून खादी भवनमधून तिरंगा ध्वज, खादीचे कपडे खरेदीकडे नागरिकांचा कल वाढ आहे.  राष्ट्रपिता महात्मा गांधींनी खादीची देशभर जागृती देशभर केली होती.  

खादीभवन येथून चार दिवसात सुमारे 1 लाख 70 हजारांचे तिरंगा ध्वज खरेदी करण्यात आले आहेत. त्यामध्ये शाळा, कॉलेज, ग्राम पंचायत, जिल्हा  पंचायत, सोसायटी, बँका आदींनी तिरंगा ध्वज खरेदी केला आहे. तसेच खादीचे कपडेही खरेदी करण्यात आले आहेत.  आठ दिवसांत सुमारे 6 लाखाची खरेदी झाली आहे. 2 ऑक्टोबरपासून एक महिना 35 टक्के खादीच्या वस्तूवर सूट दिली जाते. त्यानंतर वर्षभर खादींच्या वस्तूवर 20 टक्के सूट दिली जाते. 

प्लास्टिक ध्वजाची निर्मिती, विक्री करू नका, असा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी यापूर्वी काढला होता.  प्लास्टिकचे ध्वज रस्ता व इतर ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे  तिरंग्याचा अपमान होतो. मात्र शहरात  गणपत गल्ली, समादेवी, मारूती गल्ली आदी ठिकाणी प्लास्टिक तिरंगा ध्वज, टोप्या, रेबीन, आदींची विक्री  केली जात आहे. कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी तिरंगा सांभाळण्याची गरज आहे. शिक्षक, पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.