Tue, Jul 23, 2019 02:07होमपेज › Belgaon › बंगळूर : चहा विक्रेत्याची मालमत्ता ३३९ कोटी

बंगळूर : चहा विक्रेत्याची मालमत्ता ३३९ कोटी

Published On: Apr 20 2018 1:17AM | Last Updated: Apr 19 2018 10:59PMबंगळूर : प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला 17 एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. यंदाच्या निवडणुकीत एका श्रीमंत व्यक्तिने बोम्महनहळ्ळी मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्याने आपली मालमत्ता 339 कोटी रु.असल्याचे म्हटले आहे. 

डॉ.पी.अनिलकुमार असे या उमेदवाराचे नाव असून त्यानी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. केरळ येथून 30 वर्षांपूर्वी बंगळूर येथे रोजीरोटीसाठी  आलेल्या अनिलकुमार बंगळूर येथे एका चहाच्या दुकानात नोकरीला लागले. पुढे समाजात ओळखी वाढत गेल्याने रियल इस्टेटच्या व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात त्यांनी चांगला जम बसविला. राजकारणात आवड निर्माण झाल्याने लोकप्रतिनिधी होऊन समाजसेवा करण्याची उर्मी त्यांच्यात निर्माण झाली.

अनिलकुमार यानी  मंगळवारी बोम्मनहळ्ळी मतदारसंघातून अर्ज दाखल केला आहे. उमेदवाराने आपल्या मालमत्तेचे विवरण निवडणूक आयोगाला सादर करण्याचा  नियम आहे. डॉ.अनिलकुमार यानी आपली मालमत्ता 339 कोटी रु.आहे. तसेच पत्नीच्या नावे 50 कोटी रु. मालमत्ता असल्याचे विवरण दिले आहे. अनिलकुमाल  यांच्या हाती सध्या 5 लाख  रु. व पत्नीकडे 20 लाखांची रोकड असल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट करण्यात आले आहे.

तसेच  अनिलकुमार  यांच्या नावे बँकेमध्ये 6.30 कोटी रु., पत्नीच्या नावे 38 लाख आहे. अनिलकुमार यांच्या नावे खासगी संस्थेत 1.99 कोटी रु.चे शेअर्स आहेत.  6.11 लाख रु.किंमतीचे वाहन, 40.59 लाख रु.चे 1417 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. 83. 73 कोटी रु. किंमतीची 45 एकर जागा, पत्नीच्या नावे 10 कोटी रु.किंमतीची 3.5 एकर जागा, 18 कोटी रु.किंमतीची इतर जागा , पत्नीच्या नावे 4.85 कोटी रु., बांधकाम क्षेत्रात 258 कोटी भांडवल गुंतवणूक केली आहे. मार्टगेज कर्ज 19 कोटी रु., वाहनांवर रु.2.2 कोटींचे कर्ज आहे, असे डॉ.अनिलकुमार यानी प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.