Thu, Jul 18, 2019 13:01होमपेज › Belgaon › निपाणी विभागात उन्हाळी भुईमूग क्षेत्र निम्म्यावर

निपाणी विभागात उन्हाळी भुईमूग क्षेत्र निम्म्यावर

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 12 2018 10:18PMनिपाणी : प्रतिनिधी

यंदा खरीप हंगामपूर्व उन्हाळी भुईमूग शेती नावालाच उरली आहे. निपाणी विभागात एकूण पीक उत्पादन क्षेत्रापैकी केवळ 40 एकरावर पेरणी झाली आहे. यंदा उन्हाळी भुईमूग निम्म्यावर आल्याचे चित्र दिसून येत आहे.

भुईमूग पीक क्षेत्राचे उत्पादन घटल्याने शेंगतेलाचा दर भडकणार असल्याचे शेतकरी व विके्रत्यांचे म्हणणे आहे. या विभागातील शेती अधिकतम काळवट आहे. त्यामुळे शेतकर्‍यांकडून उन्हाळा, हिवाळा व पावसाळा ऋतुमानानुसार रब्बी व खरीप हंगामात पारंपरिक पीक घेण्यात येते. खरिपात भुईमूग, सोयाबीन, भात तर रब्बीत गहू, हरभरा, शाळू व आडसाली आणि हंगामीत उसाचे उत्पादन भरघोस पिकाचे उत्पादन  घेण्यात येते.सध्या निसर्गाचा सामना करत  शेती करताना कृषी क्षेत्राचे गणित बिघडत आहे. आठ, दहा वर्षापासून शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे उत्पादकांच्या पदरात दरवर्षी नवीन दर पडत आहे. अलिकडे हंगामापेक्षा अवकाळी व वळीव पावसाचा भरवसा न राहिल्याने उन्हाळी हंगामातील पारंपरिक पीक उत्पादनाकडे दुर्लक्ष करत ऊस उत्पादनावर भर दिला आहे.

निपाणी रयत संपर्क केंद्राशी संपर्क साधला असता मिळालेल्या माहितीनुसार सध्या शिवारातील रब्बी हंगामातील पिकाची काढणी पूर्ण झाली  आहे. शिवारात उन्हाळी कामांना वेग आला आहे. जवळपास 80 ते 90 टक्के क्षेत्रावर रब्बी हंगामातील पिकांची काढणी झाली आहे. मान्सूनच्या तोंडावर खरीप हंगामपूर्व सोयाबीन पिकाचे उत्पादन घेण्याचे तंत्र अवलंबले आहे.
यंदा भुईमूग पीक उत्पादनक्षेत्रात कमालीची घट झाली आहे. खरिपात पीक उत्पादनाच्या आधारे रब्बी शेती करावी लागते. उसामध्ये आंतरपीक म्हणून गहू, हरभरासह मका व भाजीपाल्याची पिके घेण्याचे तंत्र अवलंबले आहे.उन्हाळी शेती न परवडणारी आहे. शेतीची मशागत करून उन्हाळी भुईमूग पिकाचे उत्पादन घ्यावे लागते. वळीव झाल्यास या पिकाच्या उत्पादन वाढीवर परिणाम जाणवतो.  त्यामुळे ऊस पीक घेतलेले बरे, असे मत सौंदलगा येथील शेतकरी दत्तात्रय पाटील यांनी  सांगितले.

Tags :The summer, groundnut, area,  half  Nipani section,belgaon news