Wed, Jul 17, 2019 16:24होमपेज › Belgaon › राज्यात दारुबंदी करा

राज्यात दारुबंदी करा

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 11:12PMबेळगाव : प्रतिनिधी

महिलांना प्रत्येक क्षेत्रात समान हक्‍क देण्यात यावा. त्यांचा स्वाभिमान जपावा. त्याचबरोबर राज्यात संपूर्ण दारुबंदी करावी या मागण्यासाठी सोमवारी महिला ग्रामीण मजूर संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. त्याचबरोबर उपरोक्त मागणीचे निवेदन देण्यात आले.

समाजात महिलांना सन्मान देण्यात आला पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वाला वाव देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत. महिलांची होणारी अहवेलना थांबविण्यात यावी. अनेक घरांची राखरांगोळी करणारी दारुविक्री राज्यात बंद करण्याची मागणी महिलांनी केली. 

रोजगार हमी योजनेतील कामगारांना केंद्र सरकारकडून 100 दिवस काम देण्यात येते. उर्वरित दिवसात कर्मचार्‍यांची उपासमार होते. यासाठी यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेवून 365 दिवस कामांची उपलब्धतता करून द्यावी अशीही मागणी करण्यात आली.मोर्चाची सुरुवात राणी चन्नम्मा चौकातून झाली. यामध्ये शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या. कोर्टमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली. यावेळी दारुबंदी करण्याबाबत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.