होमपेज › Belgaon › रास्ता रोखोत अडकली नवरदेवाची वरात

रास्ता रोखोत अडकली नवरदेवाची वरात

Published On: Apr 13 2018 1:14AM | Last Updated: Apr 13 2018 1:14AMबेळगाव : प्रतिनिधी

 लग्नाला विलंब का झाला, असे विचारले तर नेहमी नवरदेवाच्या मित्रमंडळींचा धिंगाणा सुरू होता, असे सर्रास ऐकायला मिळते. मात्र नवरदेवाची वरात वाहतूक कोंडीत अडकून विलंब झाल्याची घटना घडू शकते, यावर कादचित विश्वास बसणार नाही. बेळगावसारख्या शहरात तर मुळीच नाही. कारण येथे मुंबई व पुण्यासारखी गर्दी नसते. मात्र घडले तसे.
गुरुवारी अचानक बार असोसिएशनने केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे नवरदेवाची वरात रास्ता रोको आंदोलनात अडकल्याची चर्चा दिवसभर सुरू होती.

निवेदन देण्यास पोलिसांनी बार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना मज्जाव केला. यामुळे अचानक वकिलांनी रास्ता रोको आंदोलन झेडले. चन्नमा चौकातली वाहतूक काही काळ जिल्हा आरोग्य केंद्राकडून वळविण्यात आली. यामुळे कोंडी झाली. यामध्ये नवरदेवाची  वरात अडकून राहिली. पाहुणेमंडळींनी थेट आंदोलनकर्त्यांना गाठून आपली अडचण  सांगितली. असोसिएशनचे उपाध्यक्ष मुरगेंद्रगौडा पाटील यांनी पुढाकार घेऊन नवरदेवाच्या गाडीला वाट करून दिली. यामुळे नवरदेव व त्याच्या मित्रानी सुटकेचा नि:श्वास टाकला.  विवाह वेळेत होण्यासाठी आयोजकांचा प्रयत्न असतो. मात्र नवदेवाची मित्रमंडळी गाडीसमोरच घुमायला लागतात. असे चित्र  पाहावयास मिळते. गुरुवारी अकराच्या सुमारास चन्नम्मा चौकात नवरदेवाची वरातच ट्रॅफिक जाममध्ये अडकल्याचे चित्र पाहावयास मिळाले.  नवरदेव व पै पाहुण्यांची लग्नाच्या ठिकाणी जाण्याची घाई चालली होती. आंदोलन करताना गर्दीत अडकलेल्यांना त्रास सहन करावा लागतो. मंगलप्रसंगी असे प्रसंग घडले तर नागरिकांची गैरसोय होते, अशी चर्चा चन्नम्मा चौकात होत होती.

Tags :The road , blocked , bridegroom; procession ,belgaon news