Wed, Jul 24, 2019 12:06होमपेज › Belgaon › माध्यान्ह आहाराचा दर्जाच निकृष्ट!

माध्यान्ह आहाराचा दर्जाच निकृष्ट!

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 8:13PM

बुकमार्क करा
अंकली : प्रतिनिधी

शिक्षण खात्याने 2005 पासून गरीब विद्यार्थ्यांसाठी मध्यान्ह आहार देण्याचा उपक्रम सर्व शाळांमध्ये राबविला आहे. पहिल्या टप्प्यात केवळ सरकारी शाळांतील पहिली ते सातवीपयंर्ंतच्या विद्यार्थ्यांनाच मध्यान्ह आहार देण्यात येत होता. काही वर्षापूर्वी त्याचा विचार करून सर्व सरकारी व अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांनाही याचा लाभ देण्यात येत आहे. मात्र सध्या मध्यान्ह आहाराचा दर्जा घसरल्याने बेळगाव आणि चिकोडी जिल्ह्यातील तब्बल 32,482 विद्यार्थ्यांनी माध्यान्ह आहाराकडे पाठ  फिरविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 6,26,183 विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची नोंद आहे. यापैकी5,84,259 विद्यार्थी नियमित हजर असून 5,51,777 विद्यार्थी मध्यान्ह आहाराचा लाभ घेत आहेत. केरळमध्ये मध्यान्ह आहार योजना सर्वप्रथम राबविण्यात आली. येथे ही योजना यशस्वी झाल्यानंतर कर्नाटकसह देशभरात या योजनेला सुरुवात करण्यात आली. त्यानुसार शाळेत मध्यान्ह तयार करण्यासाठी स्वयंपाकी कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली.

त्यानंतर सरकारने धोरणात बदल करून मध्यान्ह आहार बनविण्याचा ठेका स्वयंसेवी संस्थांना दिला. बेळगाव व चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात 9  स्वयंसेवी संस्थांकडे मध्यान्ह आहाराची जबाबदारी दिली आहे. ज्या शाळांमध्ये सर्व सुविधा आहेत. तेथे मध्यान्ह आहार तयार केले जात आहे. सध्या पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्याला प्रतिदिनी 150 ते 250 ग्रॅम तांदूळ याप्रमाणे मध्यान्ह आहारात भात दिला जात आहे. त्यासाठी येणारा निधी मुख्याध्यापक व एसडीएमसी अध्यक्षांच्या बँक खात्यावर जमा केला जात आहे. या निधीतूनच भाजीपाला मसाला इ. साहित्य  खरेदी केले जाते.

दररोज किती विद्यार्थ्यांनी आहार घेतला, याची माहितीही मुख्याध्यापकांना एसएमएसद्वारे मध्यान्ह आहार अधिकार्‍यांकडे द्यावी लागते. दरम्यान शिक्षण खात्याने विद्यार्थ्यांना ताजी भाजी मिळावी, यासाठी शाळेच्या आवारात भाजीपाला पिकविण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. जिल्ह्यातील काही शाळांनी हा उपक्रम राबविला आहे. लाल भाजी, कोथिंबीर, मेथी, शेपू, बीन्स, टोमॅटो इ. भाजीपाला पिकविला जात आहे.  त्याचा उपयोग मध्यान्ह आहारात केला जात आहे. तसेच शाळेच्या आवारातील नारळ, केळीही विद्यार्थ्यांना मध्यान्ह आहारात दिली जात आहेत.