होमपेज › Belgaon › सतीश जारकीहोळींची मालमत्ता ४२.७ कोटी

सतीश जारकीहोळींची मालमत्ता ४२.७ कोटी

Published On: Apr 25 2018 11:54PM | Last Updated: Apr 25 2018 11:41PMबेळगाव : प्रतिनिधी

राहू काळात उमेदवारी अर्ज दाखल करून संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरलेले अखिल भारतीय काँग्रेसचे सचिव यमकनमर्डीचे आ. सतीश जारकीहोळी यांनी आपली मालमत्ता 42.7  कोटी रु. असल्याचे जाहीर केले आहे.

सतीश यांच्याकडे सध्या 2.53 लाखांची तर पत्नीकडे 3.52 लाखांची रोकड आहे. 111 कोटी, 99 लाख, 24 हजार , 94  रुपये जंगम मालमत्ता,  पत्नीच्या नावे 5. 59 कोटी रु.जंगम मालमत्ता आहे. तसेच मुलगा आणि मुलीच्या नावे प्रत्येकी 10.30 लाखांची जंगम मालमत्ता आहे. सतीश यांच्या नावे 19 कोटी, 1 लाख, 16 हजार 793 रु.स्थावर व पत्नीच्या नावे 5 कोटी, 71 लाख,7 हजार, 40 रु.ची स्थावर मालमत्ता असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

इनामदार यांची मालमत्ता 12 कोटींची 

कित्तूरचे आमदार डी.बी.इनामदार यांनी आपली एकूण मालमत्ता 12 कोटींची असल्याचे जाहीर केले आहे.डी. बी. यांच्या नावे 2.20 कोटींची स्थावर व 2.76 कोटी रु.जंगम मालमत्ता आहे. 

डी. बी. यांच्याकडे 1 लाख रु. व पत्नीकडे 40 हजारांची रोकड आहेे. डी.बी.यांच्या नावे 10 लाख रु., 7 लाख रु. व 3. 25 लाख रु. किंमतीचे  तीन  ट्रॅक्टर आहेत. पत्नीच्या नावे 13 लाख रु. किंमतीचे होंडा डीआरव्ही व 2 लाखांची मारुती झेन अशी दोन वाहने आहेत. इनामदार यांच्याकडे सोने? चांदीची कोणतेही दागिने नाहीत. 

पत्नीकडे 14.50 लाखांचे 500 गॅ्रमचे सोन्याचे दागिने तसेच 3.37 लाखांची 6 किलो चांदी आहे. इनामदार यांच्या नावावर 10 लाखांचे कर्ज आहे.2.76 कोटींची जंगम मालमत्ता व पत्नीच्या नावे 2.05 कोटींची जगंम मालमत्ता आहे. डी.बी. यांच्या नावे 2.20 कोटींची स्थावर मालमत्ता आहे. पत्नीच्या नावे स्थावर मालमत्ता नाही.