Wed, Nov 14, 2018 21:51होमपेज › Belgaon › ‘त्या’ नोटांची छपाई हुक्केरी तालुक्यात 

‘त्या’ नोटांची छपाई हुक्केरी तालुक्यात 

Published On: Apr 23 2018 1:14AM | Last Updated: Apr 23 2018 12:37AMबेळगाव : प्रतिनिधी 

उज्ज्वलनगर येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वसतिगृहामधील 7 कोटी रुपयांच्या खेळण्यातील नोटांची छपाई हुक्केरी तालुक्यातील गुडस येथे करण्यात आल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. एपीएमसी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली असून प्रमुख संशयितास पोलिस कोठडी देण्यात आली आहे. प्रशांत बजंत्री (वय 25 मूळ रा. अंकलगी, ता. गोकाक सध्या रा. केएसआरपी वसतीगृह, एपीएमसी रोड),  नागराज तळवार (वय 29 रा. गुडस ता. हुक्केरी) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस निरीक्षक रमेश हाणापूर आणि त्यांच्या पथकाने शुक्रवारी प्रशांत नागराजला अटक करून कसून चौकशी केली असता 2 हजार आणि 500 रुपयांच्या हुबेहुब दिसणार्‍या चिल्ड्रन बँकेच्या नोटा छापल्याचे तपासात उघडकीस आले आहे. तसेच या प्रकरणी अजित निडोणी (वय 32 मूळ रा. विजापूर, सध्या रा. सदाशिवनगर) याला अटक करून न्यायालयीन परवानगीने पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. मात्र चौकशी पूर्ण झाल्याने त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले. 

अजित निडोणीने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वसतिगृहामध्ये या चिल्ड्रन बँकेच्या 2 हजार आणि पाचशेच्या नोटा ठेवल्या होत्या. 18 एप्रिल रोजी मध्यरात्री सीबीआयच्या पथकाने छापा टाकून मोठ्या प्रमाणात नोटा जप्त केल्या होत्या. सदरच्या गुन्ह्यातील तिघांवर भा.दं.वि. 971(इ), (एच) 489 (वी) 420 कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 

Tags : Belagaum, printing, those, notes,  Hukkari District