Thu, Nov 15, 2018 14:22होमपेज › Belgaon › कुमारस्वामी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता

कुमारस्वामी दोन मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची शक्यता

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 12:07AMबंगळूर : पुढारी ऑनलाईन 

माजी मुख्यमंत्री आणि निधर्मी जनता दलाचे राज्य अध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी राज्यात होणार्‍या विधानसभा निवडणूक रामनगर आणि चन्नपट्टण या दोन मतदार संघातून लढविण्याची शक्यता आहे. पक्षाच्या पहिल्या पक्ष उमेदवारांच्या यादीप्रमाणे कुमारस्वामी रामनगर मतदार संघातून निवडणूक लढविणार आहेत.

बुधवारी निजदचे सर्वेसर्वा एच.डी.देवेगौडा यानी कुमारस्वामी हे बन्नपट्टणमधुनही निवडणूक लढविण्याची शक्यता बोलून दाखविली. कुमारस्वामी दोन विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविणार असतील तर त्याना आपला आक्षेप नाही असे नमूद केले.

 

Tags : Karnataka, Assembly election, H D Kumaraswamy, Ramnagar, Channapatna,