Tue, Jul 16, 2019 01:35होमपेज › Belgaon › कुद्रेमानी लक्ष्मी मंदिर उद्घाटन  रांगोळीतून ‘जय महाराष्ट्र’ ने

कुद्रेमानी लक्ष्मी मंदिर उद्घाटन  रांगोळीतून ‘जय महाराष्ट्र’ ने

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 11:46PMबेळगाव : प्रतिनिधी

मंदिरांचे उद्घाटन धार्मिक कार्यक्रमांनीच होते. तीच परंपरा आहे. पण रांगोळीतून ‘जय महाराष्ट्र’ रेखाटून मंदिर उद्घाटन सोहळ्याचे महत्त्व वाढवले ते कुद्रेमानीतील महिलांनी.
मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी गावात जय्यत तयारी करण्यात आली होती. घरोघरी रांगोळ्या रेखाटून गाव सजविण्यात आले होते. लक्ष्मी गल्ली परिसरात ‘जय महाराष्ट्र’ लिहिलेल्या रांगोळ्या घरोघरी काढण्यात आल्या होत्या. यामुळे बाहेरून येणार्‍यांना याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. 

लक्ष्मी मंदिराचा उद्घाटन सोहळा मंगळवारी उत्साहात पार पडला. ग्रा. पं. अध्यक्षा अशिता सुतार व सामाजिक कार्यकर्त्या विमल साखरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जीर्णोद्वार करण्यात आलेल्या लक्ष्मी मंदिराचा उद्घाटन सोहळा शनिवारपासून सुरू होता. मंगळवारी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. भुतरामहट्टी येथील सोमेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांचे गावात टाळ-मृदंगांच्या गजरात स्वागत करण्यात आले. यावेळी रस्त्यात फुले अंथरण्यात आली होती. पाद्यपूजा अरुण देवण दाम्पत्याने केले. स्वामींच्या हस्ते मंदिर कळशारोहण करण्यात आले.  चौकट पूजन ग्रा. पं. सदस्य काशिनाथ गुरव व अरुण देवण, कासव पूजन विष्णु बडसकर, गाभारापूजन ता. पं. सदस्या शुभांगी राजगोळकर, लक्ष्मी पूजन दीपक पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.

कळसपूजन ग्रा. पं. सदस्य मोहन पाटील, रामचंद्र पन्हाळकर यांनी केले.यावेळी ग्रा. पं. उपाध्यक्षा मल्लव्वा नाईक, डॉ. निवृती गुरव, वैजू पाटील, नागोजी हुलजी, गणपती पाटील, गोविंद पाटील, परशराम पाटील, शिवाजी पाटील आदी उपस्थित होते. ओटी भरण्याचा पहिला मान पुजारी टोपाण्णा देवण दाम्पत्याला देण्यात आला. त्यानंतर गावातील सुवासिनींनी देवीची ओटी भरून दर्शनाचा लाभ घेतला. 
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रा. पं. सदस्य नागेश राजगोळकर,  बाळाराम धामणेकर, रवी पाटील, महादेव गुरव, ईश्‍वर गुरव, मोहन शिंदे, अर्जुन जांबोटकर, शिवाजी मुरकुटे, बाळाराम कदम, एस. बी. गुरव, राजाराम राजगोळकर, मारुती पाटील, गणपती बडसकर आदींनी परिश्रम घेतले.