Wed, Jul 24, 2019 02:15होमपेज › Belgaon › मुनवळ्ळी मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात

मुनवळ्ळी मुख्याधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Published On: Mar 06 2018 12:08AM | Last Updated: Mar 05 2018 11:45PMबेळगाव : प्रतिनिधी

सौंदत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी नगरपालिकेचे मुख्याधिकारी लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या जाळ्यात सापडल्याची घटना सोमवारी घडली.
येथील बेळगाव विभागाच्या पथकाकडे मुनवळ्ळी येथील पंचाप्पा जंबगी यांनी  दाखल केलेल्या  तक्रारीनुसार छापा टाकून लाच स्वीकारताना सदर पथकाने अधिकार्‍यांना रंगेहाथ पकडलेे. मुनवळ्ळी नगरपालिका मुख्याधिकारी संगाप्पा एस. ब्याळी, सहाय्यक भीमरायप्पा हनुमंतप्पा अनी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
मुनवळ्ळी येथील पंचाप्पा जंबगी यांना डॉ. बी. आर आंबेडकर वसती योजनेतून घर मंजूर करण्यात आले आहे. सदर लाभार्थ्याने घराचे तिसर्‍या व पाचव्या टप्प्यातील बिल देण्यासाठी मागणी केली होती. मात्र सदर बिल देण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकर्‍यांनी त्याच्याकडे 15 हजार लाच देण्याची मागणी केली होती. याची दखल घेऊन एसीबी पथकाने सापळा रचून  15 हजाराची लाच घेताना पकडले.