Sat, Jan 19, 2019 15:47होमपेज › Belgaon › सरकारने महागाईवर अंकुश ठेवावा

सरकारने महागाईवर अंकुश ठेवावा

Published On: May 05 2018 12:49AM | Last Updated: May 04 2018 9:32PMमहिलांच्या हातात स्मार्ट फोन असला तरी पाण्याचा हंडा दूर गेलेला नाही. शहराच्या विकास आराखड्यात स्त्रीला केंद्रभूत ठेवून विकासाची योजना केल्यास महिलांचे प्रश्‍न मार्गी लागतील. देशाच्या प्रगतीत महिला सबलीकरण महत्वाचे आहे. आज महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. 

गृहोपयोगी वस्तूंच्या दरात सवलत मिळावी. मुलांच्या शिक्षणाची फी कमी करावी. महिलांना सन्मान, स्वच्छता आणि स्वाभिमानाने जगण्यासाठी झगडावे लागत आहे. आम्ही खूप काही मिळविले तरी कोसो दूर आहोत, अशी अवस्था महिलांची झाली आहे.

ग्रामीण भाग स्मार्ट झाला नाही. ग्रामीण स्त्रिया-मुलींना पाण्यासाठी डोक्यावर हंडे घेऊन फिरावे लागते. यासाठी ग्रामीण भागात मुबलक पाण्याची सोय करावी. महिलांविषयक कायदे काटेकोर राबवावेत, मंदिर, दर्गा प्रवेशाबाबतची भूमिका स्पष्ट करावी, महिलांच्या आरोग्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होते. ते बदलले पाहिजे. महिलांची सुरक्षा आज चिंतेचा विषय बनला आहे. मोठ्या शहरात बलात्कारासारख्या घटना वाढल्या आहेत. अशा घटनांवर आळा घालण्यासाठी शासनाने योग्य पावले उचलली पाहिजे. जेणेकरून महिलांना सुरक्षीत वाटेल. महिला देखील पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून काम करित आहेत. मात्र, त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे. जो नेता विकास करेल त्याला आम्ही मतदान करणार आहोत. अनेक उमेदवार फक्त मतदानापुरता गल्ली बोळात फिरतात नंतर त्यांच्याकडून दुर्लक्ष होते. असे होता कामा नये. 
रुपाली पाटुकले, गृहिणी