Fri, Apr 26, 2019 10:11होमपेज › Belgaon › काँग्रेस सरकारचा कारभार पारदर्शक

काँग्रेस सरकारचा कारभार पारदर्शक

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMनिपाणी : प्रतिनिधी  

आगामी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा ठाम विश्‍वास पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी व्यक्‍त केला. ते पत्रकार परिषदेत बोलत हेाते. येत्या शनिवार दि. 24 रोजी अथणी येथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.  

ते म्हणाले, राज्यात कर्नाटक सरकारने पारदर्शक व जनहिताची कामे केली असल्याने आगामी विधानसभा निवडणुकांत राज्यात पुन्हा काँग्रेसचेच सरकार येऊन सिध्दरामय्या हे पुन्हा मुख्यमंत्री होतील. कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व राहुल गांधी यांच्या माध्यमातून काँग्रेसने केलेले कार्य सर्वत्र पोहचविण्यासाठी अथणी येथे कार्यकर्त्यांच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. याकरिता राज्यातून मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. निपाणी परिसरातूनही कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने सहभागी होतील. 

पालकमंत्र्यांनी निपाणी विधानसभेच्या उमेदवाराविषयी बोलतांना सांगितले की, राज्यातील सर्व उमेदवारांचे निर्णय पक्षश्रेष्ठी राहुल गांधी, जी. परमेश्‍वर व मुख्यमंत्री सिध्दरामय्या हेच घेणारआहेत.

याप्रसंगी गेल्या आठवड्यात कुंभार गल्ली येथे झालेल्या दोन गटातील भांडणा संदर्भात आपल्यावर पोलीसांकडून अन्याय झाली असल्याची तक्रार कुंभार गल्ली येथील महिलांनी पालक मंत्र्यांकडे केली. यावेळी पालकमंत्र्यांनी तत्काळ सीपीआय किशोर भरणी यांना जाब विचारून कुचराई केल्याबद्दल धारेवर धरले. तसेच पोलिसांनी नागरिकांशी व महिलांशी सभ्यपणे वागले पाहिजे असे सांगीतले. माजी आ. काकासाहेब पाटील, नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी पोलिसांची भूमिका दुर्दैवी असल्याचे सांगीतले.  

सचिन केस्ते, उत्तम पाटील यांनी विविध गावातील प्रश्‍नांसंदर्भात जारकीहोळी यांची भेट घेतली. जारकीहोळींचे स्वागत माजी आम. काकासाहेब पाटील यांनी केले. मोहन बुडके, प्रदीप जाधव, दोस्तमहंमद पठाण, सुजय पाटील, संजय सांगावकर, निकू पाटील,  नासिरखान इनामदार, अनवर बागवान, शरीफ बेपारी, रामा निकम, अनिल शिंंदे, दीपक वळीवडे, बाळासाहेब कमते, बबन जामदार, नजीर मुल्ला, राजन चिकोडे यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.