Wed, Mar 20, 2019 08:35होमपेज › Belgaon › ट्रॅक्टरखाली दुचाकी येऊन विद्यार्थिनी ठार

ट्रॅक्टरखाली दुचाकी येऊन विद्यार्थिनी ठार

Published On: Jan 08 2018 1:12AM | Last Updated: Jan 07 2018 11:48PM

बुकमार्क करा
निपाणी : प्रतिनिधी 

ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलीखाली सापडून दुचाकी चालविणारी रत्नाबाई ऊर्फ प्रियांका बंडू भोजे (वय 11,  रा. सदलगा) ही विद्यार्थिनी ठार झाली, तर लावण्या श्रीकांत मालगावे (वय 8, रा. यड्राव) ही गंभीर जखमी झाली. ही दुर्घटना रविवारी सदलगा येथील यल्लम्मा मंदिराजवळ घडली. 

ट्रॅक्टर सदलगा येथून बेडकिहाळकडे ऊस भरून जात होता. मंदिरजवळ दुचाकीवरील प्रियांकाचा ताबा सुटल्याने दुचाकी ट्रॅक्टरखाली आली. त्यात प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी पोलिस निरीक्षक संगमेश दिडगीनहाळ व सहकार्‍यांनी भेट देऊन पंचनामा केला. प्रियांका ही कुंदकुंद कन्‍नड शाळेमध्ये पाचवीत शिकत होती. शनिवारी प्रियांकाच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होता. तो पाहण्यासाठी प्रियांकाची मावसबहीण लावण्या मालगावे आली होती.