Thu, Mar 21, 2019 23:21
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › केंद्राच्या कार्यामुळे भाजपला सर्वत्र यश  

केंद्राच्या कार्यामुळे भाजपला सर्वत्र यश  

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 12 2018 8:15PMरायबाग : प्रतिनिधी     

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  देशातील 21 राज्ये काँग्रेसमुक्त केली आहेत. गेल्या 4 वर्षांत केंद्रातील भाजप सरकारने केलेल्या कार्याचे हे फलित असल्याचे प्रतिपादन राज्यसभा सदस्य डॉ. प्रभाकर कोरे यांनी केले.

येथील यल्लट्टी महाराज मठ आवारात भारतीय जनता पक्षाच्यावतीने रायबाग विधानसभा मतदारसंघ मर्यादित कमल यात्रेचे आयोजन शनिवार व रविवार असे दोन दिवस करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करून डॉ. कोरे बोलत होते. रायबाग व कुडची मतदारसंघात विरोधी पक्षाला उमेदवार मिळत नाहीत.  या मतदारसंघातील जनतेचा कल भाजपच्या बाजूनेच असल्याचे ते म्हणाले. 

अध्यक्षस्थानावरून बोलताना आ. डी. एम. ऐहोळे म्हणाले, माझ्या दहा वर्षांच्या आमदारकीच्या काळात मतदारसंघाच्या विकासासाठी सरकारकडून कोट्यवधींचा निधी मंजूर करून आणला. रस्ते, पाणी यासारख्या सुविधा जनतेला उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात कायदा? सुव्यवस्था बिघडली आहे. वरिष्ठ स्तरावरील अधिकार्‍यांना संरक्षण मिळत नाही, अशी खंत आम. पी. राजीव यांनी व्यक्त केली.

चिकोडी जिल्हा भाजप अध्यक्ष शशिकांत नाईक यांनी पक्ष व संघटना याबद्दल माहिती दिली. त्यानंतर इचलकरंजी भक्तीयोगाश्रमाचे महेशानंद स्वामींचे आशीर्वादपर भाषण झाले. कार्यक्रमाला कब्बूर गौरीशंकर मठाचे रेवणसिध्द शिवाचार्य स्वामी तसेच  जि. पं. सदस्य निंगाप्पा पकांडी, के. के. म्हैशाळे, सदानंद हळिंगळी, सदाशिव घोरपडे, अनिल साने, दुंडप्पा भेंडवाड, बसवराज दोनवाडे,महेश भाते, भरत बनवणे आदी उपस्थित होते.