Sun, Apr 21, 2019 04:23होमपेज › Belgaon › व्हॉटसअप वक्‍तृत्व स्पर्धेत बेळगावातील चौघांचे यश

व्हॉटसअप वक्‍तृत्व स्पर्धेत बेळगावातील चौघांचे यश

Published On: May 23 2018 1:07AM | Last Updated: May 22 2018 7:50PMबेळगाव : प्रतिनिधी

व्हॉटसअपच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेत बेळगावातील चौघांनी वेगवेगळ्या गटात यश मिळविले.  ‘मी सावरकर’  या संस्थेच्यावतीने सावरकरांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार्‍या विषयावर बोलण्याची संधी वक्त्यांना देण्यात आली होती. वय वर्षे 5 ते 8 गटात उत्तेजनार्थ सानवी तुळपुळे, वय 9 ते 12 गटात उपविजेती अनुष्का आपटे, वय 22 ते 45 गटात उपविजेती  दीपाली कुलकर्णी, वय 60 वर्षावरील गटात किशोर काकडे यांना यश मिळाले.

स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश येथील स्पर्धकांनी भाग घेतला होता. या प्रकारची अभिनव वक्तृत्व स्पर्धा पहिल्यांदाच घेण्यात आली. स्पर्धेसाठी द्रष्टे सावरकर, योद्धा सावरकर, समाजसुधारक सावरकर, हिंदुत्ववादी सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, साहित्यिक सावरकर आदी विषय देण्यात आले होते. स्पर्धकांनी आपले भाषण रेकॉर्डिंग करून संयोजकांकडे व्हॉटसअपच्या माध्यमातून पाठविणे बंधनकारक होते. याला पहिल्याच वेळी चांगला प्रतिसाद लाभला.