Thu, Jun 04, 2020 04:59होमपेज › Belgaon › वन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार

वन विभागाचा वॉचमन वाहनाच्या धडकेने ठार

Published On: Dec 05 2017 1:48AM | Last Updated: Dec 04 2017 11:49PM

बुकमार्क करा

खानापूर : प्रतिनिधी

सेवा बजावून घरी परतणार्‍या वन विभागाच्या चेकपोस्टवरील तरुण वॉचमन महिंद्रा रामराव गावकर (25, रा. मान, ता. खानापूर)  याचा चोर्लानजीक दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची दुर्घटना रविवारी रात्री घडली. रविवारी दिवसभर येथे सेवा बजावून महिंद्रा सायंकाळी साडेसातच्या सुमारास मान या आपल्या गावी जाण्यास निघाला. चेकपोस्टपासून काही अंतरावरच त्याच्या दुचाकीला वाहनाने ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाला.  वन विभागाच्या वाहनातून त्याला बेळगावात सिव्हिल इस्पितळात नेले. गंभीर मार लागल्याने नाक व तोंडावाटे रक्तस्राव होऊन उपचार सुरू असताना रात्री 2 च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. 

त्याच्या पश्‍चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी आहेत. दीड महिन्यापूर्वी गोव्यातून कर्नाटकात हरवलेल्या सात पर्यटकांचा शोध लावण्यात महिंद्राने महत्त्वाची भूमिका बजावली. अंत्यविधीला जिल्हा वनाधिकारी बसवराज पाटील, कणकुंबीच्या वनक्षेत्रपाल कविता इरनट्टी, एस. एस. निंगाणी, महेश जांबोटकर आदी उपस्थित होते.