Thu, Nov 22, 2018 16:51होमपेज › Belgaon › चर्चेनंतरच अर्थसंकल्पाला अंतिम रूप : जी. परमेश्‍वर  

चर्चेनंतरच अर्थसंकल्पाला अंतिम रूप : जी. परमेश्‍वर  

Published On: Jun 18 2018 1:09AM | Last Updated: Jun 17 2018 11:54PMबंगळूर : प्रतिनिधी  

काँग्रेस आणि निजद युतीच्या समन्वय समितीत चर्चा केल्यानंतरच मांडण्यात येणार्‍या अर्थसंकल्पाला अंतिम रूप मिळेल, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जी. परमेश्‍वर यांनी दिली. मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी हे अर्थसंकल्प मांडणार आहेत. 

रविवारी पत्रकारांशी बोलताना डॉ. परमेश्‍वर म्हणाले की, राज्यात काँग्रेस आणि निजद युतीचे सरकार आहे. आमचा समान किमान कार्यक्रम ठरायचा आहे. दोन्ही पक्षांनी निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांबाबत चर्चा करण्यात येणार आहे. आम्ही सर्व आश्‍वासनांची पूर्तता करू, पण त्याचा निर्णय समन्वय समिती बैठकीत झाला पाहिजे.आताचे सरकार गरज भासल्यास नव्या तरतुदी करू शकते, असेही परमेश्‍वर म्हणाले.