Wed, Apr 24, 2019 12:24होमपेज › Belgaon › गळक्या बस यंदा तरी दुरुस्त होणार का ?

गळक्या बस यंदा तरी दुरुस्त होणार का ?

Published On: Jun 10 2018 1:47AM | Last Updated: Jun 09 2018 10:38PMजांबोटी : वार्ताहर

आधीच बस फेर्‍या रद्द करण्यात आल्या असताना आता गळक्या बसची समस्या मोठी आहे. तालुक्यात सर्वत्र जादा पाऊस पडत असताना विशेष करुन ग्रामीण भागात गळक्या बस पाठवण्यात येतात. त्यामुळे बसमध्येसुध्दा छत्र्या धरुन बसण्याची वेळ प्रवाशांवर येते. त्यामुळे यंदा तरी अशा गाड्यांची दुरुस्ती होणार का, असा प्रश्‍न प्रवाशांतून करण्यात येत आहे.

तालुक्यात अधिक प्रमाणात पाऊस पडतो. असे असताना जंगल प्रदेशातील खेड्यांत  गळक्या बस सोडल्या जातात. त्यामुळे प्रवाशांना बसमध्येही पावसाचा सामना करावा लागतो. गेल्या पाच वर्षापासून ही समस्या असताना यात अद्याप सुधारणा झालेली नाही. तालुक्यात बहुतेक गावांचे दळणवळण बससेवेवरच अवलंबून असते. मुख्य रस्त्यावरील गावे वगळता सर्रास गावांना खासगी वाहतूकही नाही. त्यामुळे बस सुस्थितीत राहणे गरजेचे आहे.तालुक्यात तीसहून अधिक खेड्यांत बसेस धावतात. रस्त्यांची समस्या असताना त्यात आता गळक्या बसगाड्यांच्या समस्येची भर पडली आहे.    

गळक्या बसगाड्यांमुळे प्रवाशांसह शाळकरी विद्यार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात. तालुक्यातील चापोली कापोली, हेम्मडगा, शिरोली,चिखलेसह अनेक दुर्गम भागात गळक्या बसगाड्या पाठवण्यात येतात. त्यामुळे आसन असताना प्रवाशांना उभे राहून प्रवास करावा लागतो. तालुक्यातील अनेक खेडी अति दुर्गम भागात वसल्याने घनदाट जंगलातून ये-जा करुन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.  त्यामुळे अशा गावातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी होती आहे.