Thu, Apr 25, 2019 11:39होमपेज › Belgaon › मालमत्तेसाठी मुलाने काढले पित्याचे डोळे

मालमत्तेसाठी मुलाने काढले पित्याचे डोळे

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:45AMबंगळूर : प्रतिनिधी

मालमत्तेसाठी मुलाने पित्याचे डोळे काढल्याची घटना येथील शाखंबरी कॉलनीत मंगळवारी घडली.

निवृत्त सरकारी कर्मचारी परमेश (वय 65) यांचा मुलगा चेतन यांच्यात मालमत्तेवरून वाद होता. मंगळवारी हा वाद विकोपाला गेला. रागाच्या भरात चेतनने पित्याच्या डोळ्यात बोटे घालून त्यांना जखमी केले. घरातील इतरांनी आरडाओरडा केल्याने पलायनाच्या प्रयत्नात असलेल्या मुलाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.  परमेश यांच्या दोन्ही डोळ्यांना गंभीर दुखापत झाली असून जे. पी. नगरातील खासगी इस्पितळात ते उपचार घेत आहेत. मुलाला अमली पदार्थाचे व्यसन जडल्याने त्याच्या नावे मालमत्ता करण्यास वडील तयार नव्हते, असे समजते.