Thu, Jun 27, 2019 11:40होमपेज › Belgaon › जात दाखल्यावर ‘मरत मराठा’ नोंद

जात दाखल्यावर ‘मरत मराठा’ नोंद

Published On: Mar 18 2018 1:07AM | Last Updated: Mar 18 2018 12:00AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठा समाजाला देण्यात येणार्‍या उत्पन्न दाखल्यावर तहसीलदार कार्यालयाकडून ‘मरत मराठा’ असा चुकीचा उल्लेख करण्यात येत आहे. यामुळे मराठा समाजाचा अवमान होत असून दाखल्यावर ‘मर्द मराठा’ असा उल्लेख करावा, अशी मागणी मराठी नेत्यांनी केली आहे.

उपरोक्त मागणीचे निवेदन शनिवारी जिल्हाधिकारी एस. झियाउल्ला यांच्या अनुपस्थितीत शिरस्तेदार जानकी यांना देण्यात आले. तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. सध्या शिधापत्रिकेसाठी उत्पन्न दाखला काढण्यात येत आहे. यामध्ये मरत मराठा असा उल्लेख करण्यात येत आहे. हा उल्लेख दुरुस्त करावा. त्याचबरोबर तालुक्यात सध्या विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. यामुळे शेतकर्‍यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.  हेस्कॉमकडून चार तास थ्री-फेज वीजपुरवठा सकाळच्या सत्रात चार तास करण्यात येत आहे. सध्या कूपनलिका, विहिरींचे पाणी कमी झाले आहे. भूजल पातळी खालावली आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ अशा दोन सत्रात वीजपुरवठा करावा. सध्या तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली असून या गावाना पाणीपुरवठा सुरू करावा, अशा मागण्या करण्यात आल्या.

अध्यक्ष म्हात्रू झंगरूचे, कार्याध्यक्ष वाय. बी. चौगुले, एपीएमसी अध्यक्ष निंगाप्पा जाधव, सचिव मनोज पावशे, ता. पं. सदस्य सुनील अष्टेकर, भावकाण्णा पाटील, पुंडलिक मोरे, संजय पाटील, कृष्णा पाटील, पुंडलिक पावशे, सुरेश अगसगेकर आदी उपस्थित होते.

URL :