Sun, Jul 21, 2019 12:04होमपेज › Belgaon › कुत्रा अंगावर सोडून जीवे मारण्याचा प्रयत्न?

कुत्रा अंगावर सोडून जीवे मारण्याचा प्रयत्न?

Published On: Aug 29 2018 1:41AM | Last Updated: Aug 29 2018 12:39AMबेळगाव : प्रतिनिधी

खासबाग येथे एका तरुणावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना  शनिवारी घडली होती. यामध्ये सुकल्प सतीश पाटील (वय 21 रा. खााबाग) हा जखमी झाला आहे. क्.ाने दाखल केलेल्या तक्रारी वरुन सागर सोमशेखर तेलसंग याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. शिवाय सागरनेही आपल्यावर खुनी हल्‍ला झाल्याची तक्रार केली आहे. 

अंगावर कुत्रा सोडून मला मारण्याचा  प्रयत्न झाला, असे सागरने तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे या  प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणी  शहापूर पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरी अधिक तपास करीत आहेत. कुत्रा अंगावर आल्याने सागरने कुत्रा पाळलेल्या सुकल्पवर चाकूने हल्‍ला केला, अशी पहिली तक्रार नोंद आहे.