Thu, May 23, 2019 04:54होमपेज › Belgaon › आघाडी सरकारचा विकास कार्यक्रम १० दिवसांत

आघाडी सरकारचा विकास कार्यक्रम १० दिवसांत

Published On: Jun 15 2018 1:04AM | Last Updated: Jun 15 2018 12:20AMबंगळूर : प्रतिनिधी

काँग्रेस-निजदच्या आघाडी सरकारचा समान विकास कार्यक्रम येत्या दहा दिवसांमध्ये निश्‍चित होणार असल्याचे  समन्वय समितीचे प्रमुख माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले.

सरकारच्या समन्वय समितीची सिद्धरामय्यांच्या नेतृत्वाखाली पहिलीच बैठक गुरुवारी पार पडली. दोन्ही पक्षांनी निवडणुकीच्या वेळी जाहीरनाम्यानुसार जी आश्‍वासने दिलेली आहेत, त्यासंबंधी मसुदा तयार करण्यात येणार आहे. किमान समान विकास कार्यक्रम येत्या पाच वर्षांच्या कालावधीसाठी राहणार आहे.

समन्वय समितीमध्ये काँग्रेसचे तीन व निजदचे दोन सदस्य राहणार असून ते विकास कार्यक्रमाचा मसुदा तयार करणार आहेत. यापूर्वीच्या काँग्रेस सरकारने अर्थसंकल्पानुसार ज्या योजना हाती घेतल्या आहेत, त्या योजना यापुढेही सुरू राहतील. विद्यार्थ्यांना मोफत बस पास देण्याचा विषयही चर्चेला घेण्यात आला होता. येत्या आठवड्याच्या कालावधीत मंडळे व महामंडळावर नियुक्त्या करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्‍वर घेणार आहेत. त्यानुसार काँग्रेसचे दोनतृतीयांश व निजदचे एक  तृतियांश असे मंडळ व महामंडळावर नियुक्‍ती करण्यात येणार असल्याचे सिध्दरामय्यांनी सांगितले.

जिल्ह्यांचे पालकमंत्री नियुक्‍ती करण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे. बैठकीला सिध्दरामय्या, मुख्यमंत्री कुमारस्वामी, उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर, काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल व निजदचे सरचिटणीस दानि अली हे उपस्थित होते.