बेळगाव : प्रतिनिधी
सेवानिवृत्त होऊन 11 महिने झाले तरी पेन्शन नाही. महापालिकेङ अनेकदा हेलपाटे मारूनही मनपाच्या आरोग्य विभागाकडून काहीच हालचाली होत नसल्याने पेन्शन लांबणीवर पडली. चऋरतार्थ कसा भागवायचा हा प्रश्न. या सार्या धक्कादायक प्रकाराचा धसका घेतल्याने महानगर ालिकेच्या निवृत्त सफाई कामगार सुवार्तम्मा यस्सय्या पेरीके (वय 61, रा. सफाई कामगार वसाहत, शहापूर) यांचा रविवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे स्वच्छता कर्मचारी संतप्त झाले आहेत.
सुवार्तम्मा 11 महिन्यांपूर्वीनिवृत्त झाल्या होत्या. पण पेन्शन अडकली. पती, विवाहित तीन मुली, आणि तीन मुले असा त्यांचा परिवार. मुले खासगी कंपनीत अल्पवेतनावर काम करत आहेत. घरखर्च भागविण्यासाठी त्यांची मोठी कसरत सुरू होती.
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे सुवर्तम्मा यांनी अनेकदा हेलपाटे मारले. मात्र, त्यांच्या पेन्शनची फाईल पुढे सरकत नव्हती. पेन्शनबाबत कार्यवाही सुरू आहे, असेच उत्तर त्यांना मिळत होते. मात्र, 11 महिने उलटले तरी पेन्शन हाती लागत नाही, याचा धसका यांनी सुवर्तम्मा यांनी घेतला.
सुवर्तम्मा यांच्या पेन्शनबाबत शहापूर येथील दलित युवा ब्रिगेडचे अध्यक्ष विजय साखे, यल्लेश बच्चलपुरी, यशवंत अनंदपूर यांनीही महापालिका आयुक्तांकडे वारंवार पाठपुरावा केला. तरीही काहीच हालचाली झाल्या नव्हत्या.
सुवर्तम्मा सेवानिवृत्त होण्याअगोदर किमान 6 महिने आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत, अशी नोटीस देण्याची आवश्यकता असताना त्यांना सेवानिवृत्त होण्याआधी केवळ 3 दिवसांपूर्वी नोटीस दिली गेली होती. त्यामुळे पुढची कागदपत्रे जमवण्यातही काही वेळ गेली. पण सारी कागदपत्रे सादर झाल्यानंतरही पेन्शन मंजूर झाली नाही.
महापालिकेच्या आरोग्य विभागातून वरिष्ठ अधिकार्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयात जा असे सांगत होते, तर जिल्हाधिकारी कार्यालयात गेले असता आरोग्य विभागाकडे जा असे सांगण्यात येत होते, अशी माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली. या सार्या प्रकारामुळे सुवर्तम्मा यांनी मोठा धसका घेतला. यातच शनिवारी मध्यरात्री त्यांना तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.