Wed, Feb 20, 2019 08:38होमपेज › Belgaon › हागणदारीमुक्‍त चिकोडीसाठी ‘गांधीगिरी’

हागणदारीमुक्‍त चिकोडीसाठी ‘गांधीगिरी’

Published On: Mar 10 2018 2:09AM | Last Updated: Mar 10 2018 12:18AMचिकोडी : काशीनाथ सुळकुडे

जिल्हा हागणदारीमुक्‍त करण्यासाठी प्रशासनाकडून गावागावांमध्ये उघड्यावर शौचास बसणार्‍या नागरिकांना गुलाबपुष्प देण्यात येत आहे. शौचालय निर्मिती व आरोग्याविषयी जागृती करण्याची योजना पहिल्यांदा चिकोडी तालुक्यात राबविली जात आहे.

गेल्या चार वर्षांपासून स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्यात  प्रशासनाकडून गावोगावी स्वच्छता उपक्रमांसह वैयक्‍तिक शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. तसेच राज्य व केंद्र शासनाकडून वैयक्‍तिक शौचालय बांधण्यासाठी 12 हजारपर्यंतचे प्रोत्साहनधनदेखील दिले जात आहे; पण अद्यापही ग्रामीण भागात म्हणावे तितके यश लाभलेले नाही. महाराष्ट्रात हागणदारीमुक्‍तीसाठी पहाटे उठून नागरिकांत जागृतीसह दंडात्मक कारवाईसारखे उपक्रम राबविण्यात आले होते. त्याला चांगले यश मिळाले आहे. त्याच धर्तीवर बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुका हागणदारीमुक्‍तीसाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. तालुका नोडल अधिकारी शिवानंद शिरगावे यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक गावामध्ये  हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे.