Fri, Jul 19, 2019 01:44होमपेज › Belgaon › देशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात

देशात सर्वाधिक उंच राष्ट्रध्वज बेळगावात

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:29AMबेळगाव : प्रतिनिधी

मराठा लाईट इन्फंट्री या लष्कराच्या मानबिंदूचे मुख्यालय असणारे शहर ही आतापर्यंतची बेळगावची ओळख. त्या लौकिकात आता भर पडली आहे ती सर्वाधिक उंचीवरील राष्ट्रध्वजाची. देशातील सर्वाधिक उंचीवरील राष्ट्रध्वज बेळगावात फडकला आहे. सोमवारी हा राष्ट्रध्वज राष्ट्राला समर्पित करण्यात आला.

तब्बल 110 मीटर म्हणजेच 361 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावर सोमवारी तिरंगा फडकावला गेला. हा सर्वाधिक उंचीचा ध्वजस्तंभ असून, आतापर्यंत हा मान भारत-पाक सीमेवरील पंजाबमधील अटारीतील ध्वजस्तंभाला होता. अटारीतील ध्वज 360 फूट उंचीवर आहे. बेळगावातील ध्वज 361 फूट उंचीवर आहे. 120 फूट लांबी आणि 80 फूट रुंद असलेला हा तिरंगा किल्ला तलावाशेजारी ‘बुडा’ कार्यालयासमोर फडकावला गेला. वैशिष्ट्य म्हणजे हा ध्वज अहोरात्र फडकता राहणार आहे. 

मॉन्युमेंटल फ्लॅग

तिरंगा खादीच्या कापडामध्येच शिवला जातो; पण हा ध्वज अहोरात्र फडकता राहणार असल्यामुळे हवामानामुळे तो खराब होऊ नये, यासाठी पॉलिस्टर कापडाचा वापर केला आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाची  परवानगी घेतली आहे. अशा ध्वजांना मॉन्युमेंटल फ्लॅग ध्वज संबोधले जाते.

110  110 मीटर (361 फूट) ध्वजस्तंभाची उंची

36 टन ध्वजस्तंभाचे वजन

120 फूट ध्वजाची लांबी

80  फूट ध्वजाची रुंदी

13 मिलिमीटर ध्वजाची जाडी

9600 चौरस फूट ध्वजाचे आकारमान

8 मि.मी. ध्वजाच्या दोरीचा व्यास

1.62 कोटी रुपये  एकूण खर्च

3.5 एच.पी. मोटारचा वापर ध्वज फडकावण्यासाठी

बजाज, पुणे ध्वज बनवणारी कंपनी

पॉलिस्टर ध्वजाचे कापड