Thu, Jul 18, 2019 11:03होमपेज › Belgaon › शहरातील उड्डाण पुलांचे अखेर केले नामकरण...

शहरातील उड्डाण पुलांचे अखेर केले नामकरण...

Published On: Feb 06 2018 11:03PM | Last Updated: Feb 06 2018 11:02PMबेळगाव : प्रतिनिधी

जुना धारवाड रोड येथील रेल्वे उड्डाण पुलाला छ. शिवाजी महाराज उड्डाण पूल, एसपीएम रोड येथील उड्डाण पुलाला कपिलेश्‍वर उड्डाण पूल तर खानापूर रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाला  जगज्योती बसवेश्‍वर असे नामकरण मंगळवारी मनपाच्या सर्व साधारण बैठकीमध्ये एक मताने करण्यात आले. अनेक महिन्यांपासून नामकरणाचा हा विषय रेंगाळला होता. 

वर्षभरापासून विस्मृतीत गेलेल्या उड्डाणपुलाच्या नामकरणाचा मुद्दा 28 जानेवारीला ‘पुढारी’ने ‘उड्डाण पुलाचे शिवराय नामकरण कधी?’ या मथळ्याखाली पुन्हा चर्चेला आणला. यानंतर खडबडून जागे झालेल्या महानगरपालिकेने पुलाच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेला घेतला.  कपिलेश्‍वर रोडवरील रेल्वे उड्डाण पुलाला 25 डिसेंबर 2017 रोजी 1 वर्ष पूर्ण झाले. ‘पुढारी’तील वृत्ताची दखल घेऊन त्वरित शिवराय नामकरण करावे, अशी मागणी शहरवासीयांतून होत होती. 

उड्डाणपूल नामकरणासंबंधी महापौर संज्योत बांदेकर म्हणाल्या, सदरचा प्रश्‍न रेल्वे खात्याकडे प्रलंबित असल्याची माहिती दिली होती. हा पूल रेल्वे खात्याने उभारला आहे. त्यामुळे नामकरणाचा ठराव रेल्वे खात्याकडे पाठवून देऊ.