Wed, Nov 21, 2018 13:19



होमपेज › Belgaon › तिघांवर आरोपपत्र

तिघांवर आरोपपत्र

Published On: Jun 08 2018 1:21AM | Last Updated: Jun 08 2018 12:47AM



बेळगाव : प्रतिनिधी

बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तिघांविरुद्ध राष्ट्रीय तपास संस्थेने आरोपपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये पश्‍चिम बंगालमधील एकट्याचा तर बेळगाव जिल्ह्यातील दोघांचा समावेश आहे. 

गेल्या मार्चमध्ये चिकोडीत बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अशोक कुंभार आणि राजेंद्र पाटील यांना अटक झाली होती. बंगालच्या मालडामधील रहिवासी डालुमिया ऊर्फ जालीम ऊर्फ यासिनमुल्ला डालू याला पुण्यातून अटक केल्यानंतर बनावट नोटांचे धागेदोरे चिकोडीपर्यंत पोहोचले होते. 

चिकोडीत 2 हजार मूल्याच्या 41 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने चिकोडी पोलिसांत तक्रार नोंदविली होती. गुरुवारी या प्रकरणात बंगळूरच्या विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. अशोक कुंभार व राजेंद्र पाटील यांच्या मदतीने डालुमिया बनावट नोटा बेळगावमध्ये चलनात आणण्याचा प्रयत्न करत होता, असे तपास संस्थेचे म्हणणे आहे. डालुमियाने 2 हजार रुपये मूल्याच्या 6 लाख 80 हजार आणि 3 लाख 50 हजार रुपयांच्या नोटा 2 टप्प्यांत अशोक कुंभारकडे पाठविल्या होत्या, असेही आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे.