होमपेज › Belgaon › विना नटबोल्ट धावली बस...

विना नटबोल्ट धावली बस...

Published On: Aug 13 2018 1:20AM | Last Updated: Aug 12 2018 10:24PMबेळगाव : प्रतिनिधी

बसच्या चाकाचे नटबोल्ट तुटले तरी प्रवास सुरुच होता. दरम्यान, एका दुचाकीस्वाराच्या लक्षात सदर बाब आल्यानंतर त्याने बस थांबवून याबाबत माहिती दिली. त्यानंतर प्रवाशांना दुसर्‍या बसमधून  पाठविण्यात आले. उचगाव फाटा येथे ही घटना घडली. 

बेळगाव येथून नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी 7.30 वा. उचगावमार्गे अतिवाडला बस निघाली होती. ही बस अतिवाडला पोहोचल्यानंतर 8 वा. परतीचा प्रवास सुरु झाला. मात्र, सदर बसच्या मागील डावीकडील चाकाचे सर्व नटबोल्ट तुटून गेले  होते. चाकही थोडे बाहेर येत होते.  बस उचगाव फाटा येथे आली असता एक दुचाकीस्वाराने नटबोल्ट तुटल्याचे चालकाच्या लक्षात आणून दिले. चालकाने बस थांबवून सर्व प्रवाशांना दुसर्‍या बसमधून बेळगावला पाठवून दिले. दुचाकीस्वाराच्या जागरुकतेमुळे मोठा अनर्थ टळला.