Thu, Jul 18, 2019 02:22होमपेज › Belgaon › निपाणी,चिकोडीकडे जिल्ह्याची नजर

निपाणी,चिकोडीकडे जिल्ह्याची नजर

Published On: Mar 14 2018 12:52AM | Last Updated: Mar 13 2018 10:46PMनिपाणी : प्रतिनिधी

आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षासाठी अस्तित्त्व सिध्द करण्याचे मोठे आव्हान उभे ठेपले आहे. भाजपची विजयाची गती आणि कर्नाटकात असलेली काँग्रेची स्थिती पाहता निवडणूक कांटे की टक्‍कर होणार, यात शंकाच नाही. बेळगाव जिल्ह्यात चिकोडी  सदलगा आणि निपाणी विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.

पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसच्या अधिकाधिक जागा निवडणूक आणणार, असा विश्‍वास व्यक्‍त केला आहे. जिल्ह्यात तशी काँग्रेसची ताकदही मोठी आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात खासदार प्रकाश हुक्केरी यांनी विकासकामांच्या जोरावर सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे. 

बेळगाव जिल्ह्यात चिकोडी  सदलगा आणि निपाणी विधानसभा मतदारसंघावर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे. चिकोडी सदलगा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार गणेश हुक्केरी काँग्रेस यांच्याविरुध्द भाजप उमेदवार कोण आणि निपाणी मतदारसंघात भाजप आमदार शशिकला जोल्‍ले यांनी राबविलेली विकासकामे पाहता काँग्रेस उमेदवार कोण, याबाबत तर्कवितर्क लढविले जात 
आहेत. 

चिकोडी सदलगा मतदारसंघातून भाजपतर्फे सहकारनेते अण्णासाहेब जोल्‍ले यांनी निवडणूक लढविण्याची तयारी यापूर्वीच दर्शविली आहे. गतवेळी गणेश हुक्केरी यांच्याविरुध्द  विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी निवडणूक लढविली. आता अण्णासाहेब जोल्‍ले, महांतेश कवटगीमठ की आणखी कोण, याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत.

नूकताच तालुका म्हणून कार्यरत झालेल्या निपाणी विधानसभा मतदारसंघात आमदार जोल्‍लेंविरुध्द माजी आमदार काकासाहेब पाटील, युवानेते उत्तम पाटील की सध्या माजी आमदार प्रा. सुभाष जोशी काँग्रेसतर्फे निवडणूक लढविणार, याबाबतही चर्चा सुरू आहे. प्रा.सुभाष जोशी यांनी नुकताच मेळावा घेऊन कार्यकर्त्यांची ताकद दाखवून दिली आहे. खरेतर निपाणी मतदारसंघात  प्रा. सुभाष जोशी किंगमेकरच ठरले आहेत.