Fri, Apr 19, 2019 08:32होमपेज › Belgaon › कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच : कुमारस्वामी  

कर्जमाफीची घोषणा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्येच : कुमारस्वामी  

Published On: Jun 16 2018 1:28AM | Last Updated: Jun 15 2018 11:29PMबंगळूर : प्रतिनिधी

जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन बोलाविण्यात येणार असून त्या अधिवेशनामध्येच शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याची घोषणा केली जाईल, असे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी  यांनी स्पष्ट केले आहे.

पत्रकारांशी बोलताना कुमारस्वामी म्हणाले, कर्जमाफीचा निर्णय मला एकट्यालाच घेता येत नाही. त्याचे कारण म्हणजे राज्यामध्ये संयुक्त सरकार सत्तेवर आहे. काँग्रेसच्यादृष्टीने राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. परंतु शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्याकरिता मी संपूर्ण काळजी घेणार आहे. अंदाजपत्रकीय अधिवेशन जुलैच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार असून त्याठिकाणी आपण सर्वच समस्या निकालात काढणार आहोत. राज्याचे अर्थखातेही आपल्याकडेच असल्याने त्यांनी सांगितले. शेतकर्‍यांची कर्जे माफ करण्यासाठी सरकारमध्ये कोणताच गोंधळ नाही.

हा विषय आपण एकदा निकालात काढणार आहोत. जास्तीत जास्त शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्नशील आहे. निजद एकाच पक्षाला सत्ता मिळाली असतील तर आपण तातडीने हा विषय निकालात काढला असता परंतु आपले सरकार हे काँग्रेस व निजद या दोन पक्षाचे मिळून आहे. काँग्रेसला विश्‍वासात घेवूनच हा कर्जमाफीचा निर्णय आपण घेणार आहोत. यासंदर्भात आपण बँकांशी व अधिकार्‍यांशीही चर्चा करणार आहोत. कर्जमाफीचा हा विषय एकूण 53 हजार कोटींचा असल्याने राज्याच्या खजिन्यावर त्याचा ताण पडणार आहे.