Sun, Mar 24, 2019 22:56
    ब्रेकिंग    होमपेज › Belgaon › विधानपरिषद सदस्यांचे २३ रोजी बंगळूरमध्ये धरणे 

विधानपरिषद सदस्यांचे २३ रोजी बंगळूरमध्ये धरणे 

Published On: Jan 20 2018 1:38AM | Last Updated: Jan 20 2018 12:13AMबेळगाव : प्रतिनिधी      

राज्य सरकारने ग्राम पंचायत, तालुका पंचायत व जिल्हा पंचायतींना अधिक अधिकार द्यावेत. लोकसंख्येच्या आधारावर अनुदान वितरीत करावेत. ग्रामीण विकास आणि पंचायत राज खात्यातील अधिकार्‍यांच्या रिक्त जागा भराव्यात आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी दि. 23 रोजी बंगळूर येथे विविध पक्षाच्या 25 विधानपरिषद सदस्यांकडून विधानसौध येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आ. महांतेश कवटगीमठ यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

राज्यातील विविध राजकीय पक्षाच्या विधानपरिषद सदस्यांनी या निर्णयाला सहमती दिली आहे. त्यानुसार दि. 23 रोजी विधानसौध येथे महात्मा गांधी पुतळ्याजवळ आंदोलन करण्यात येणार आहे. सरकार अधिक ग्रामपंचयात सदस्य असणार्‍या आणि कमी सदस्य असणार्‍या ग्राम पंचायतींना समान विकासनिधी देत आहे. यामुळे अधिक ग्रा. पं. सदस्य असणार्‍या सदस्यांवर अन्याय हाेत आहे.

यासाठी ग्रा. पं. सदस्यांच्या संख्येनुसार अनुदान द्यावे. वितरित करण्यात आलेल्या अनुदानातून 50 टक्के अनुदान खर्च करण्याचा अधिकारी ग्रामपंचायतील द्यावा. राज्यामध्ये बेळगाव जिल्हा सर्वात मोठा जिल्हा आहे. त्यानुसार जिल्हा पंचायतीलाही अधिक अनुदान द्यावे. याबरोबरच तालुका पंचायतींना अनुदान देवून तालुका पंचायतीचे महत्त्व आबाधित राखावेत, अशी मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जि. पं. अध्यक्षा आशा ऐहोळे, उपाध्यक्ष अरुण कटांबले, माजी अध्यक्ष किरण नाकाडी, माजी खा. अमरसिंग पाटील, बसगौडा पाटील आदी उपस्थित होते.