Fri, Jul 19, 2019 05:00होमपेज › Belgaon › कर्नाटक राज्य बार कौन्सिल निवडणूक २८ मार्चला

कर्नाटक राज्य बार कौन्सिल निवडणूक २८ मार्चला

Published On: Jan 25 2018 1:02AM | Last Updated: Jan 24 2018 11:36PMबेळगाव : प्रतिनिधी

कर्नाटक राज्य बार कौन्सिलची अत्यंत चुरशीची निवडणूक 28 मार्चला होणार आहे. यासाठी गुरुवार दि. 25  रोजी अधिसूचना लागू करण्यात येणार आहे. राज्य पातळीवरील ही निवडणूक एकूण 25 जागासाठी होणार असून यासाठी एकूण 45,000 वकील मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

या निवडणुकीसाठी 1 फेब्रुवारीपयर्ंत उमेदवारी अर्ज भरणे, 22 ला उमेदवारी अर्ज मागे घेणे, 1 मार्च रोजी अंतिम यादी व 28  रोजी मतदान होणार आहे. प्रॅक्टिस करत असलेले प्रमाणपत्र (सीओपी) सादर करण्याची सक्ती राज्य बार कौन्सिलने केल्यामुळे एकूण  75000 वकिलांपैकी कार्यरत असलेले 45000 वकील मतदार या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणार आहेत.