Tue, Nov 20, 2018 13:27होमपेज › Belgaon › दहावी परीक्षा २३ मार्चपासून 

दहावी परीक्षा २३ मार्चपासून 

Published On: Dec 16 2017 1:40AM | Last Updated: Dec 16 2017 1:40AM

बुकमार्क करा

बंगळूर : प्रतिनिधी

2017-18 या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी परीक्षेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. 

23 मार्च रोजी प्रथम भाषा विषयाच्या पेपरने सुरू होणारी ही परीक्षा 6 एप्रिल रोजी समाजशास्त्र विषयाच्या पेपरने संपेल. प्रश्‍नपत्रिकांचे वाचन करण्यासाठी 15 मिनिटे ज्यादा वेळ देण्यात येणार आहे. 

गेल्या वर्षी एसएसएलसी परीक्षा 30 मार्च रोजी सुरू होऊन 12 एप्रिल रोजी संपल्या होत्या. पण यावर्षी विधानसभा निवडणुकीमुळे परीक्षा लवकर घेण्यात येणार आहेत. सविस्तर वेळापत्रक कर्नाटक माध्यमिक शिक्षण परीक्षा मंडळाच्या (केएसईईबी) वेबसाईटवर उपलब्ध आहे. 27 आणि 31 मार्च रोजी परीक्षा नाही. 1 एप्रिल आणि 25 मार्च रोजी रविवार आहे. 30 मार्च रोजी गुडफ्रायडेची सुटी आहे.