Fri, Apr 26, 2019 15:20होमपेज › Belgaon › दहा वर्षांपूर्वी 12, यंदा 10

दहा वर्षांपूर्वी 12, यंदा 10

Published On: May 11 2018 1:11AM | Last Updated: May 10 2018 9:18PMबेळगाव : प्रतिनिधी

मराठी विरुद्ध मराठी अशी लढत होत असल्याने खानापूर मतदारसंघात यंदा 2008 चीच स्थिती निर्माण झाली आहे.  खानापूर   मतदारसंघात 2008 मध्ये 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी 12 उमेदवार मराठी होते. त्यापैकी दोन  उमेदवार  वगळता आपणच म. ए. समितीचे अधिकृत उमेदवार असा प्रचार सारे जण करीत होते. यंदाच्या निवडणूकीत 13 उमेदवारापैकी 12 उमेदवार मराठी भाषिक आहेत. त्यापैकी दोन राष्ट्रीय पक्षातर्फे निवडणूक लढवीत आहेत. उर्वरीत 10 उमेदवारांपैकी दोघे उमेदवार आपणच समिती उमेदवार असल्याचा प्रचार करत आहेत.

2008 मध्ये 12 उमेदवार मराठी भाषीक असल्याने मराठी मतांची विभागणी झाली. त्याचा लाभ साहजिच राजकीय पक्षाला झाला. प्रल्हाद रेमाणी (भाजप) यांनी तालुक्यात पहिल्यांदा मुसंडी मारली. इतिहासात पहिल्यांदा म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या खानापूर मतदार संघाला खिंडार पडले. यंदाही 12  उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. त्या पैकी डॉ. अंजलीताई निंबाळकर काँग्रेसमधून तर भाजपमधून विठ्ठल हलगेकर (भाजप)तर्फे निवडणूक लढवीत आहेत. म.ए. समितीतर्फे अरविंद पाटीलव  समितीचे म्हणेून सांगणारे पण बंडखोर असणारे विलास बेळगावकर निवडणूक लढवीत आहेत. यंदाच्या निवडणूकीत  देखील मराठी भाषीक उमेदवार डझनमध्ये आहेत.

2018 चे उमेदवार

अरविंद पाटील (म. ए. समिती), अंजली निंबाळकर (काँग्रेस), विठ्ठल हलगेकर (भाजप), नासीर बागवान (निजद), विलास बेळगावकर, मेघना देसाई, यशवंत निप्पाणीकर, कृष्णाजी पाटील, जोतिबा रेमाणी,  महादेव शिंदोळकर,  यल्लाप्पा बेळगावकर, लक्ष्मण बन्नार, श्रीकांत बजंत्री. 

2008 चे उमेदवार

दिगंबर पाटील,अरविंद पाटील, मुरलीधर पाटील, मर्‍याप्पा पाटील, इराप्पा पाटील, राजगोपाल पाटील, अर्जुन पाटील, डी. एम. गुरव, एच. एन. देसाई, परशराम करंबळकर, महादेव मरगाळे, वैशाली पाटील, सागर कोशावर, नासीर बागवान, प्रल्हाद रेमाणी, रफिक खानापूरी, अशोक बेंद्रे बसाप्पा अंबोजी, कोमल जिनगोंडा, नागाप्पा कोलकार, चेनू मलगौडा, बाबू मुलीमनी, मुकुटसाब धारवाडी, वसंत मादार.